डेब्यू टेस्टमध्ये 10 चेंडू टाकले, दोन वर्षांपासून संघाबाहेर, कमबॅक सामन्यातील पहिल्याच चेंडूवर ‘तो’ हिरो ठरला

डेब्यू टेस्टमध्ये 10 चेंडू टाकले, दोन वर्षांपासून संघाबाहेर, कमबॅक सामन्यातील पहिल्याच चेंडूवर 'तो' हिरो ठरला

बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आज सकाळी सुरुवात झाली आहे. ब्रिस्बेन येथील 'द गाबा' या मैदानात हा सामना खेळवला जात आहे.

अक्षय चोरगे

|

Jan 15, 2021 | 8:08 AM

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आज (15 जानेवारी) सकाळी सुरुवात झाली आहे. ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. नवोदित भारतीय गोलंदाजांनी कसलेली गोलंदाजी करत कांगारुंना हैराण केले आहे. (Shardul Thakur took wicket first ball in Brisbane Test India vs Australia)

सामन्यातील सकाळच्या सत्रात दोन भारतीय गोलंदाज हिरो ठरले. मोहम्मद सिराजने सामन्यातील पहिल्याच षटकात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्यानंतर वैयक्तिक पहिल्या आणि सामन्यातील 9 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरने मॉर्कस हॅरिसची शिकार केली. शार्दुलने फेकलेला चेंडू हॅरिसने स्केवर लेगच्या दिशेने ढकलला आणि वॉशिंग्टन सुंदरने एक अप्रतिम झेल टीपला. शार्दुल ठाकूरने तब्बल दोन वर्षांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. दोन वर्षांनी कमबॅक करण्याऱ्या शार्दुलने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत त्याच्या घातक गोलंदाजीचं दर्शन घडवलं.

शार्दुलने 2018 मध्ये कसोटी संघात डेब्यू केला केला होता. या सामन्यात त्याला केवळ 10 चेंडू टाकता आले. त्यानंतर दोन वर्षांपासून तो संघातून बाहेर राहिला. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत (सि़डनी कसोटी) भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे त्याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. शार्दुलने या संधीचं सोनं केलं.

टीम इंडियाचा अनुभवहीन बॉलिंग अटॅक

शार्दुल फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 62 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 206 विकेट्स घेतल्या आहेत. 31 धावा देत 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ब्रिस्बेन कसोटीत शार्दुल एकटाच नवखा खेळाडू नाही. भारतीय संघातील सर्वच गोलंदाज नवखे आहेत. मोहम्मद सिराज, टी. नटराजन, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर हे पाच गोलंदाज भारतीय संघात आहेत. या पाचही जणांनी मिळून आतापर्यंत 13 कसोटी बळी मिळवले आहेत. तर सिराज, सैनी, नटराज आणि सुंदर हे चारही गोलंदाज त्यांच्या कारकीर्दीतली पहिलीच कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे नवख्या गोलंदाजांसह टीम इंडिया ब्रिस्बेन कसोटी कशी जिंकणार असा सवाल भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात आहे.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ (India Playing XI) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी. नटराजन

हेही वाचा

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया, मालिका कोण जिंकणार?

ब्रिस्बेन कांगारुंचा बालेकिल्ला, टीम इंडियाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी

(Shardul Thakur took wicket first ball in Brisbane Test India vs Australia)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें