गब्बरच्या आयुष्यात वादळ, धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट, कारणांची जोरदार चर्चा

टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) घटस्फोट घेतला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याची पत्नी आयेशा मुखर्जीची (Aesha Mukerji) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गब्बरच्या आयुष्यात वादळ, धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट, कारणांची जोरदार चर्चा
शिखर धवन पत्नीसोबत

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) घटस्फोट घेतला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याची पत्नी आयेशा मुखर्जीची (Aesha Mukerji) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर आयेशा मुखर्जीने एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. शिखरच्या बाजूने अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृतपणे स्टेटमेंट आलेलं नाही. (Shikhar Dhawan Divorces with wife Aesha Mukerji, instagram post viral)

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. धवन आणि आयेशा यांना झोरावर नावाचा मुलगाही आहे. आयेशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 मध्ये तिने धवनच्या मुलाला जन्म दिला. धवन आणि आयेशाचे लग्न झाले तेव्हा बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. पण धवनच्या आईने त्याला साथ दिली. ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली.

2020 मध्ये, त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला असल्याचा बातम्या आल्या. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. यासोबतच आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरचे फोटो काढून टाकले होते. मात्र धवनच्या अकाऊंटवर आयेशाचे फोटो आहेत. आयेशाने इंस्टाग्रामवर घटस्फोटाबद्दल लिहिले आहे की, ‘एकदा घटस्फोट घेतल्यानंतर असे वाटले की दुसऱ्यांदा बरेच काही धोक्यात आले आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. मात्र जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप भीतीदायक होते. मला वाटले की घटस्फोट हा एक घाणेरडा शब्द आहे, पण मी दोनदा घटस्फोट घेतला. शब्दांचे किती शक्तिशाली अर्थ आणि कनेक्शन असू शकतात हे मजेदार आहे. घटस्फोटित म्हणून मला स्वतःला हे समजले आहे. ‘

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

आयेशाची घटस्फोटाच्या अनुभवाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट

आयेशाने पुढे म्हटले आहे की, “जेव्हा मी पहिल्यांदा घटस्फोट घेतला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला असे वाटले की मी आयुष्यात अयशस्वी झाले आहे आणि त्यावेळी मी खूप चुकीचे करत आहे असे वाटत होते. मला वाटले की मी सर्वांना निराश केले आहे आणि स्वार्थी देखील आहे. मला वाटले की, मी माझ्या पालकांना निराश करत आहे. मी माझ्या मुलांचा अपमान करत आहे आणि काही प्रमाणात मला असे वाटले की मी देवाचाही अपमान करतेय.”

“घटस्फोट हा एक अतिशय घाणेरडा शब्द होता. म्हणूनच हे माझ्यासोबत पुन्हा घडले आहे. ते भयंकर होते. एकदा घटस्फोट घेतल्यानंतर, दुसऱ्यांदा मला असे वाटले की माझ्याकडे बरेच काही आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. म्हणून जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप वाईट होते. मी पहिल्यांदा ज्या भावनांमधून गेले होते ते पुन्हा परत आले. शंभर पट भीती, अपयश आणि निराशा. याचा अर्थ काय?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

इतर बातम्या

‘सर जाडेजा’चा नवा विक्रम, इंग्लंडच्या भूमीत नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय अष्टपैलू

सामन्याआधी टीम इंडियाला ‘युजलेस’ म्हणणाऱ्या मायकल वॉनची नवी प्रतिक्रिया, भारताच्या विजयानंतर राग अनावर, म्हणाला…

VIDEO : शार्दूलने ओव्हलवरील दमदार कामगिरी मागील गुपित सांगितले, विजयानंतर लॉर्ड ठाकूरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

(Shikhar Dhawan Divorces with wife Aesha Mukerji, instagram post viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI