BCCI Central Contract | ईशान किशन-श्रेयस अय्यरची मस्ती जिरवली, बीसीसीआयची मोठी कारवाई

Ishan Kishan And Shreyas Iyer | बीसीसीआयने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांवर कारवाईचा चाबूक चालवला आहे. बीसीसीआयने ईशान आणि श्रेयसला चांगलीच अद्दल घडवली आहे.

BCCI Central Contract | ईशान किशन-श्रेयस अय्यरची मस्ती जिरवली, बीसीसीआयची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 7:28 PM

मुंबई | बीसीसीआयने आगामी 2023-2024 वर्षासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबती माहिती दिली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारातून काही खेळाडूंची मस्ती जिरवली आहे. तर युवा आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा या वार्षिक करारात समावेश केला आहे. बीसीसीआयने रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार आणि बऱ्याच खेळाडूंना पहिल्यांदाच वार्षिक करारात समावेश केला आहे. तर दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बीसीसीआयने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना चांगलीच अद्दल घडवली आहे. बीसीसीआयने ईशान आणि श्रेयस या दोघांना वार्षिक करारातून वगळलं आहे. बीसीसीआयने या दोघांसह इतर सर्व वार्षिक करारप्राप्त खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचे आदेश दिले होते. मात्र ईशान आणि श्रेयस या दोघांनी बीसीसीआयच्या या आदेशाला जुमानलं नाही. अनेक दिवस टोलवाटोलवी केल्यानंतर हे दोघे खेळण्यास तयार झाले. मात्र तोवर उशीर झाला. अखेर बीसीसीआयने या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला.

हे सुद्धा वाचा

बीसीसीआयचा नवा नियम

बीसीसीआयने या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसोबत एक नवीन नियमही केला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, वार्षिक करार पाहिजे असल्यास संबंधित खेळाडूने किमान 3 कसोटी, 8 वनडे किंवा 10 टी 20 या तिघांपैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता केलेली असायला हवी. ही अट पूर्ण केलेली असल्यास त्या खेळाडूची बीसीसीआयकडून सी ग्रेडमध्ये समावेश केला जाईल. बीसीसीआय खेळाडूंची वार्षिक करारासाठी 4 गटात वर्गवारी करते. त्यानुसार ए प्लस, ए, बी आणि सी अशा श्रेणी आहेत. त्यानुसार खेळाडूंना एका वर्षासाठी अनुक्रमे 7, 5, 3 आणि 1 कोटी रुपये दिले जातात.

बीसीसीआयकडून नवा नियम

रवींद्र जडेजाला पदोन्नती

दरम्यान बीसीसीाआयने टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजाचं प्रमोशन केलं आहे. बीसीसीआयने रवींद्र जडेजाचा थेट ए प्लस कॅटेगरीत समावेश केला आहे. त्यामुळे जडेजाला आता आगामी वर्षासाठी 7 कोटी रुपये मिळणार आहेत. जडेजाच्या एन्ट्रीमुळे ए प्लस या कॅटेगरीत एकूण 4 खेळाडू आहेत. यामध्ये आधीपासून कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

कोणता खेळाडू कोणत्या कॅटेगरीत?

ए प्लस | रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ए | रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.

बी | सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल.

सी | रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.