AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा? पहिल्या विजयानंतर काय घडलं?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. पण दुसऱ्या सामन्यात कर्णधार बदलला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे. शुबमन गिलला नेमकं काय झालं? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा? पहिल्या विजयानंतर काय घडलं?
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा? पहिल्या विजयानंतर काय घडलं?Image Credit source: TV9 Network/Telegu
| Updated on: Jul 15, 2026 | 8:28 PM
Share

India vs England, 2nd ODI: एजबेस्टनमध्ये पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. आता टीम इंडिया दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा मानस आहे. दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सामना सुरू होईल. पण या सामन्यात शुबमन गिलच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण पहिल्या वनडे सामन्यात फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. डोळ्यासमोर शतक असताना त्याने मैदान सोडलं होतं. 80 धावांवर शुबमन गिल रिटायर्ड हर्ट झाला होता. आता दुसऱ्या वनडे सामन्यात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर पडेल. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

शुबमन गिलला आराम दिला तर श्रेयस अय्यर कर्णधार!

श्रेयस अय्यरच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा असल्याने गिलच्या गैरहजेरीत त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं जाणार यात काही शंका नाही. गिल फलंदाजीला ओपनिंग येतो, त्यामुळे ओपनिंगची जबाबदारी म्हणून इशान किशन प्लेइंग 11 मध्ये येईल. पहिल्या सामन्यात शुबमन गिलने चांगली कामगिरी केली आहे. त्याचा फॉर्म पाहता संघाचं नेतृत्व आणि फलंदाज म्हणून असणं गरजेचं आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल गेल्याने क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे. इशान किशन टी20 मालिकेत खेळला आहे. पण त्यात आखुड टप्प्याच्या चेंडूवर फटकेबाजी करताना अडचण होत असल्याचं दिसून आल आहे. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज त्याला कार्डिफमध्ये अडचणीत आणू शकतात.

अय्यरवर दबाव वाढणार

श्रेयस अय्यरने यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये टी20 मालिकेत संघाची धुरा सांभाळली आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया सात सामन्यात खेळली. पण त्यापैकी सहा सामने टीम इंडियाने गमावले. तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरकडे जबाबदारी आली आणि टीम इंडियाचा पराभव झाला तर काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्ही आताच बांधून ठेवा.

गिलच्या गैरहजेरीत अशी असेल प्लेइंग 11

इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर बराड़, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक