AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा, 776 दिवसांनी स्टार खेळाडूची एन्ट्री

Sri Lanka vs England 1st Odi Playing 11: टीम मॅनेजमेंटने पहिल्या सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनचे पत्ते उघडले आहेत. जाणून घ्या इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन कशी आहे.

Cricket : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा, 776 दिवसांनी स्टार खेळाडूची एन्ट्री
India vs EnglandImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 21, 2026 | 4:22 PM
Share

न्यूझीलंडने भारत दौऱ्यात जबरदस्त सुरुवात करत यजमान टीम इंडियाला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे टीम इंडियाला पहिल्यांदाच पराभूत करत भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर आता उभयसंघात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधीची ही शेवटची टी 20i मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांची या मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

इंग्लंडचा श्रीलंका दौरा 2026

तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्याची गुरुवार 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 वनडे आणि 3 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पहिल्या वनडेसाठी परंपरेनुसार काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

ओपनरचं टीममध्ये 2 वर्षांनंतर कमबॅक, कोण आहे तो?

श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तसेच इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 वर्षांनंतर ओपनर झॅक क्रॉली याचं कमबॅक झालं आहे.

अशी आहे प्लेइंग ईलेव्हन?

इंग्लंडसाठी झॅक क्रॉली आणि बेन डकेट या दोघांवर ओपनिंगची जबाबदारी असणार आहे. तर जेकब बेथल, हॅरी ब्रूक, जोस बटलर आणि जो रुट या चौघांवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे.

फिरकीची तिघांवर मदार

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेतील परिस्थिती पाहता प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 प्रमुख फिरकीपटूंचा समावेश केला आहे. आदिल रशीद आणि लियाम डॉसन या दोघांवर श्रीलंकेला गुंडाळण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच विल जॅक्स या स्पिनर ऑलराउंडरचीही रशीद आणि डॉसनला साथ मिळणार आहे.

इंग्लंड पहिल्या वनडेसाठी सज्ज

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), विल जॅक्स, सॅम करन, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन आणि आदिल रशीद.

चरिथ असलंकाकडे श्रीलंकेचं नेतृत्व

दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी चरिथ असलंका श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. चरिथसमोर मायदेशात इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून टीमला मालिका जिंकून देण्याचं आव्हान असणार आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.