SMAT 2025 : अभिषेक शर्माकडून हार्दिक पांड्याची धुलाई, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक; पण…
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत बडोदा आणि पंजाब हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत अभिषेक शर्माने झुंजार खेळी केली. यावेळी त्याने अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही सोडलं नाही. पण असं असूनही बडोद्याने बाजी मारली.

सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेतील एलिट सी गटात पंजाब आणि बदोडा यांचा आमनासामना झाला. या सामन्यात पंजाबाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अभिषेक शर्मा ओपनिंगला उतरला आणि त्याने आपल्या आक्रमक शैलीने फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. यावेळी त्याने हार्दिक पांड्यालाही सोडलं नाही. दुखापतीनंतर हार्दिक पांड्याने देशांतर्गत क्रिकेटमधून कमबॅक केला आहे. पण पहिल्याच सामन्यात त्याला अभिषेक शर्माच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अभिषेक शर्मा फलंदाजीला आणि आक्रमक बाणा दाखवला. हार्दिक पांड्याचे सुरुवातील चार चेंडू खेळले आणि त्यावर त्याने 12 धावा काढल्या. यात एक षटकार आणि एक चौकार मारला.
हार्दिक पांड्यानंतर रसिक सलाम त्याच्या रडावर आला. त्याच्या 8 चेंडूत 25 धावा काढल्या. यात दोन षटकार आणि तीन चौकार मारले. अभिषेक शर्माने अवघ्या 18 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यात 4 षटकार आणि 5 चौकार मारले. म्हणजेच चौकार आणि षटकार मारत 50 धावांमधील 44 धावा केल्या. बदोद्याकडून हार्दिक पांड्या सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 1 गडी घेत 52 धावा दिल्या. पंजाबकडून अनमोलप्रीतने 32 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकांरांच्या मदतीने 69 धावा केल्या. यासह पंजाबने 20 षटकात 8 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावा दिल्या.
हार्दिक पांड्याचा झंझावात
विजयी धावांचा पाठलाग करताना बडोद्याकडून विष्णु सोळंकी आणि शशावत रावत ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 66 धावांची भागादारी केली. शशावत रावत 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर विष्णु सोळंकी 43 धावांवर बाद झाला. दोन विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरला. मग काय हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीची सर्व कसर भरून काढली. बडोद्याच्या गोलंदाजांची धुलाई केली. 42 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार मारत 183.33 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 77 धावा केल्या. शिवालिक शर्मा 47 धावांवर असताना रिटायर्ड आऊट झाला. तर जितेश शर्मा नाबाद 6 धावांवर राहिला. हा सामना बडोद्याने 7 गडी आणि 5 चेंडू राखून जिंकला.
