AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA : सरदार बडा असरदार, वर्ल्डकमध्ये अमेरिकेविरूद्ध पहिल्याच बॉलवर विकेट घेत अर्शदीपने रचला इतिहास, पाहा Video

IND vs USA Arshdeep First Ball Wicket : भारत आणि अमेरिकेविरूद्ध सामना सुरू असून भारतीय संघ प्रथम फिल्डिंग करत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज याने अर्शदीप सिंग याने कमाल करून दाखवली. सरदारजीने पहिल्याचं बॉलवर बत्या गुल केल्या.

IND vs USA : सरदार बडा असरदार, वर्ल्डकमध्ये अमेरिकेविरूद्ध पहिल्याच बॉलवर विकेट घेत अर्शदीपने रचला इतिहास, पाहा Video
arshdeep singh first ball first wicket video
| Updated on: Jun 12, 2024 | 9:29 PM
Share

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अमिरिकेमधील सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह  याने आपल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर यश मिळवलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा आमनेसामने आलेल्या भारत अमेरिकेच्या सामन्याची सुरूवात अशा दमदार अंदाजामध्ये झाली आहे. अर्शदीप सिंह याने ओपनिंगसाठी उतरलेल्या शायन जहांगीर याला पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट केलं.

पाहा व्हिडीओ:-

टी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्शदीप सिंग हा सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आहे. त्याच्याआधी बांगलादेशचा मशरफी मुर्तझा आणि अफगाणिस्तानचा शापूर जद्रान यांनीही ही कामगिरी केली आहे. तर नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमॅनने T20 विश्वचषक सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेतली आहे. मोर्तझा आणि जद्रान यांनी 2014 मध्ये ही कामगिरी केली होती.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सार्थ ठरवत अर्शदीप सिंहनेही पहिल्याच बॉलवर संघाला यश मिळवून दिलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (डब्ल्यू), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.