Babar Azam: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, बाबर आझमची ऐतिहासिक कामगिरी
Babar Azam USA vs PAK: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने इतिहास रचला आहे. बाबरने विराटचा सर्वाधिक टी 20 धावांचा विश्व विक्रम मोडीत काढला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार आणि फलंदाज बाबर आझम याने इतिहास रचला आहे. बाबर आझम याने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात यजमान यूनायटेड स्टेटस विरुद्ध सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. बाबरने यूएसए विरुद्ध 43 बॉलमध्ये अतिशय संथ गतीने 102.33 च्या स्ट्राईक रेटने 3 चौकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. बाबरने या खेळीदरम्यान स्वत:च्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड केला. बाबरने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्व विक्रम केला. बाबरने याबाबतीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला पछाडलं.
बाबरला विराटचा हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी यूएसए विरुद्धच्या सामन्याआधी 16 धावांची गरज होती. बाबरच्या नावावर 4 हजार 23 धावा होत्या. बाबरने यूएसए विरुद्ध 16 वी धाव पूर्ण करताच विराटला पछाडलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. मात्र बाबरचा हा वर्ल्ड रेकॉर्ड किती तास त्याच्या नावावर राहिल, याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. कारण बाबर आणि विराट यादोघांच्या धावांमध्ये अवघ्या 29 धावांचं अंतर आहे. त्यात टीम इंडिया-पाकिस्तान हे दोन्ही संघ 9 जून रोजी आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध 30 धावा केल्यास पुन्हा विराटच्या नावावर पुन्हा हा वर्ल्ड रेकॉर्ड होईल.
कुणाच्या नावे किती धावा?
दरम्यान आता आपण ताज्या आकडेवारीनुसार टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा असलेल्या टॉप 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या 2 फलंदाजांचा समावेश आहे. तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आयर्लंडचा प्रत्येकी 1-1 फलंदाज आहे.
बाबर आझम – 4 हजार 67 धावा
विराट कोहली – 4 हजार 38 धावा
रोहित शर्मा – 4 हजार 26 धावा
पॉल स्टर्लिंग – 3 हजार 591 धावा
मार्टिन गुप्टील – 3 हजार 531 धावा
बाबर आझम नंबर 1
Leading the list 🔝@babarazam258 is the all-time top run-getter in T20Is 👏#T20WorldCup | #USAvPAK | #WeHaveWeWill pic.twitter.com/DoFs54cWZa
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 6, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.
