AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup संघातून हार्दिक पंड्याला डच्चू मिळणार? पुढील चार दिवसात फैसला

असे म्हटले जात होते की, अंतिम संघ देण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर होती परंतु ती फक्त त्याच संघांसाठी होती जे 17 ऑक्टोबरपासून पात्रता फेरीत खेळतील.

T20 World Cup संघातून हार्दिक पंड्याला डच्चू मिळणार? पुढील चार दिवसात फैसला
हार्दीक पंड्या
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 7:37 PM
Share

मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या टी – 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. मात्र, बीसीसीआयच्या निवड समितीला हवे असल्यास ते संघात बदल करू शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे चार दिवस आहेत. आयसीसीकडे विश्वचषकासाठी संघ पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघातील काही खेळाडू अलीकडेच IPL-2021 मध्ये खेळून मोकळे झाले आहेत, तर काही अजूनही खेळत आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नावाची मोठी चर्चा आहे कारण त्याने गोलंदाजी न करणे हा चिंतेचा विषय आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्ते पंड्याबाबाबत अद्याप विचारात आहेत आणि तो गोलंदाज म्हणून संघात राहील की नाही याचा विचार करत आहेत. तसेच संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज जोडण्याचा विचार केला जात आहे. (T20 World Cup : BCCI Selectors will take call on Hardik Pandya on 15th october)

वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पंड्याबाबत पुढील काही दिवसात निर्णय होऊ शकतो. निवडकर्त्यांनी फक्त तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे, कारण पंड्या फिट असेल तर तो त्याच्या कोट्यातून चार षटके गोलंदाजी करू शकेल असा विश्वास होता. त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही, तसेच तो फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही.

संघात बदल केले जाऊ शकतात

असे म्हटले जात होते की, अंतिम संघ देण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर होती परंतु ती फक्त त्याच संघांसाठी होती जे 17 ऑक्टोबरपासून पात्रता फेरीत खेळतील. टीओआयने आयसीसीच्या एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “संघ त्यांचा सपोर्ट पीरियड सुरू होण्याच्या सात दिवस आधीपर्यंत संघात बदल करू शकतात. भारताचा सपोर्ट पीरियड सुपर -12 टप्प्यापासून सुरू होत आहे, म्हणजेच 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्यामुळे बीसीसीआयकडे संघ बदलण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे.

निवड समितीला काय वाटतं

वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्त्यांना पंड्याबद्दल पूर्णपणे खात्री बाळगायची आहे. संपूर्ण विश्वचषकात गोलंदाजी करण्यासाठी पंड्या पूर्णपणे फिट आहे याविषयी पूर्ण स्पष्टता हवी आहे. पंड्याचा मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पंड्याने या संपूर्ण आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांची स्टँड बाय म्हणून निवड झाली आहे. गरज असल्यास, यापैकी एकाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. सूत्राने सांगितले की, “पंड्याने गोलंदाजी केली नाही तर त्याला वगळले जाईल असे ठरवण्यात आले नाही, पण अष्टपैलू म्हणून त्याच्याकडे कमी वेळ आहे. ठाकूर आणि दीपक संघात आल्यास, निवडकर्ते हर्षल पटेलला यूएईमध्ये राहण्यास सांगू शकतात.”

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(T20 World Cup : BCCI Selectors will take call on Hardik Pandya on 15th october)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.