WTC Final 2021 : फ्लाईंग शीखचा सन्मान, टीम इंडियाकडून भर मैदानात मिल्खा सिंहांना अनोखी श्रद्धांजली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताची पहिली फलंदाजी असून भारतीय संघ महान धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली देण्याकरता हाताला काळ्या फिती बांधून मैदानात उतरले आहेत.

WTC Final 2021 : फ्लाईंग शीखचा सन्मान, टीम इंडियाकडून भर मैदानात मिल्खा सिंहांना अनोखी श्रद्धांजली
Milkha Singh
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 3:41 PM

साऊथॅम्प्टन :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या (ICC World Test Championship Final) अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने खोडा घातल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. त्यानंतर आज मात्र भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या अंतिम सामना दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु करण्यात आला. न्यूझीलंडने टॉस जिंकत फिल्डिंग घेतली. ज्यामुळे भारताला फलंदाजीसाठी उतरावे लागले असून भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले आहेत. दरम्यान भारतीय संघाने महान धावपटू मिल्खा सिंग यांना अनोख्याप्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे. (Team India is wearing black armbands in remembrance of Milkha Singhji In WTC Final Match against New Zealand)

भारताच्या सर्व खेळाडूंनी हाताला काळ्या फिती बांधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सलामीसाठी उतरेलेले रोहित आणि शुभमन यांच्या हाताला काळ्या फिती देखील दिसून आल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

मिल्खा यांची कोरोनाशी झुंज अपयशी

भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं 18 जून रोजी कोरोनामुळं निधन झालं. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे 2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) ते सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी दु:ख व्यक्त करत सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा :

‘आम्ही एका महान खेळाडूला गमावून बसलो’, मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक

Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी

Milkha Singh | पत्नीच्या मृत्यूनंतर 5 दिवसातच अखेरचा श्वास, पहिली भेट आणि मिल्खा सिंह यांची प्रेम कहाणी

(Team India is wearing black armbands in remembrance of Milkha Singhji In WTC Final Match against New Zealand)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.