IND vs AUS : 1 मालिका-3 सामने, रोहित कर्णधार, विराटही सज्ज, टीम इंडियाची घोषणा शनिवारी!
Rohit Sharma and Virat Kohli : क्रिकेट चाहत्यांना लवकरच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. टीम इंडिया ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे.

नवव्यांदा आशिया चॅम्पियन झाल्यानंतर टीम इंडिया सध्या मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेत 2 हात करत आहेत. या कसोटी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांची गेल्या अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपणार आहे. टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकदिवसीय मालिकेत 3 सामने होणार आहेत. तर टी 20 सीरिजमध्ये 5 मॅचेस होणार आहेत.
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाची दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. एकदिवसीय मालिकेचा थरार 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान टी 20I मालिका होणार आहे. मात्र चाहत्यांना एकदिवसीय मालिकेचे वेध लागले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने टी 20I-कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. तसेच दोघे कसोटी-टी 20I मधून निवृत्त झाल्यानंतर वनडे क्रिकेटमध्येच खेळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची या दोघांना पुन्हा एकदा ऑन फिल्ड पाहण्याची प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेने संपणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा आहे. या मालिकेला मोजून काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. आता संघाच्या घोषणेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
टीम इंडियाची घोषणा केव्हा?
क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समिती शनिवारी 4 ऑक्टोबरला भारतीय संघाची घोषणा करु शकते. आता निवड समिती एकाच वेळेस वनडे आणि टी 20I या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर करणार की नाही? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच कुणाला संधी मिळणार? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
रोहित-विराटचं 7 महिन्यांनी कमबॅक फिक्स!
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतून भारतीय संघात विराट आणि रोहितचं तब्बल 7 महिन्यांनी कमबॅक होणार आहे. भारतीय संघाने अखेरचा एकदिवसीय सामना हा न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 9 मार्चला पराभूत करत 12 वर्षांनी पहिल्यांदा आणि एकूण दुसर्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती.
