Retirement : टीम इंडियासाठी इतिहास रचणारे ‘हे’ पाच हुकमी एक्के कधीही घेऊ शकतात निवृत्ती, पाहा कोण?
टीम इंडियाचे हुकमी एक्के म्हणून ज्यांनी जगभर आपल्या खेळाने देशाची मा उंचावली. असे पाच खेळाडू आता कधीही आपली निवृत्ती जाहीर करू शकतात. यामधील एक तर टीम इंडियाचा कॅप्टनही राहिलाय, पाहा कोण आहेत.

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिका 19 सप्टेंबरला सुरू होत आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा करणार आहे. टीममध्ये कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे. बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड होण्यासाठी असे काही दिग्गज खेळाडू आहेत ज्यांची निवड होईल असं काही वाटत नाही. कारण यशस्वी जयस्वाल, सर्फराज खानसारखे युवा खेळाडू निवडीच्या प्रतीक्षेत असताना दिग्गजांची निवड अशक्य वाटत आहे. पाच खेळाडू आहेत ज्यांना अजुनही निवड होण्याची आशा आहे. मात्र हे खेळाडूसुद्धा आता कधीही आपली निवृत्ती जाहीरक करू शकतात.
द वॉल म्हणून ओळखल्या राहुल द्रविडची जागा पुढे चेतेश्वर पुजाराने चालवली. टीम इंडियाकडून खेळताना पुजाराने अनेक सामने जिंकवले आहेत. मैदानात तळ ठोकून राहणारा पुजारा आता टीम इंडियामध्ये नाही. पुजाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये शेवटचा सामना खेळलाय. कामगिरीमध्ये सातत्य न ठेवता आल्याने पुजाराने आपली जागा गमावली. 36 वर्षीय चेतेश्वर पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 शतके आणि 35 अर्धशतके केलीत.
मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याने दीड वर्षांपासून टीमबाहेर होता. आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीनंतर त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यासाठी संधी मिळाली होती. एकेकाळी टीम इंडियाचा उपकर्णधार असलेला रहाणे आता टीम इंडियामध्ये जागा मिळेल या आशेवर आहे. रहाणेने 85 कसोटी सामन्यात 5077 धावा केल्या असून त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवही गेल्या अनेक वर्षांपासून संघामध्ये नाही. जून 2023 मध्ये उमेश यादव याने शेवटचा सामना खेळला होता. 36 वर्षीय उमेश यादव याने 57 कसोटी, 75 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे त्याने 170, 106 आणि 12 विकेट्स घेतल्या आहेत. साहाने भारतासाठी 40 कसोटी आणि 9 वनडे सामने खेळले आहेत. केएस भरत, इशान किशन, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत या युवा कीपर्समुळे साहासाठी कमबॅक करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बाहेर आहे. मात्र आता कसोटीमध्ये त्याच्यासाठी दारे बंद झाली आहेत. बीसीसीआय निवड समितीकडे वेगवान गोलंदाज म्हणून अनेक पर्याय आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये ईशांतसाठी कमबॅक अशक्य आहे. ईशांत शर्माने 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 311, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 115 आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.
