AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: मदतीचा हात! मिरजेतल्या वॉन्लेस हॉस्पिटलच्या मदतीला धावली टीम इंडिया

IND vs ENG: पुढच्या महिन्यापासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. उद्याच त्यासाठी भारतीय संघाचा एक ग्रुप इंग्लंडला रवाना होणार आहे. दुसरा ग्रुप बंगळुरूहून 19 तारखेला रवाना होईल.

IND vs ENG: मदतीचा हात! मिरजेतल्या वॉन्लेस हॉस्पिटलच्या मदतीला धावली टीम इंडिया
Image Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 3:54 PM
Share

मुंबई: पुढच्या महिन्यापासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. उद्याच त्यासाठी भारतीय संघाचा एक ग्रुप इंग्लंडला रवाना होणार आहे. दुसरा ग्रुप बंगळुरूहून 19 तारखेला रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ (IND vs ENG) एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. हा दौरा संपल्यानंतर टीम इंडिया मिरजेतल्या एक हॉस्पिटलसाठी विशेष सामना खेळणार आहे. 25 जूनला हा सामना होईल. टीम इंडिया मदतनिधी उभारण्यासाठी इंग्लंडमध्ये हा सामना खेळणार आहे. या सामन्यातून जमा होणारा पैसा वॉन्लेस हॉस्पिटलला (Wanless hospital Miraj) दिला जाईल. वेस्ट इंडिजचे (West Indies) महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनीज हा सामना पहण्यासाठी उपस्थित असतील. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध हा सामना खेळणार आहे. मिरजेतील वॉनलेस रूग्णालयच्या मदतीला इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या रूग्णालयातर्फे नर्सिंगसह काही वैद्यकीय अभ्यासक्रम चालविले जातात.

माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज अमेरिका, इंग्लंडसह परदेशात वास्तव्यास आहेत. इंग्लंडमध्ये या कॉलेजचे सर्वात अधिक माजी विद्यार्थी राहतात. वॉन्लेस रूग्णालय सध्या बिकट परिस्थितीमधून जात असल्याचे इंग्लंडमध्ये राहणार्‍या त्या माजी विद्यार्थ्यांना समजलं. त्यामुळे त्यापैकी काही माजी विद्यार्थ्यांनी वॉन्लेसच्या नावाने फाऊंडेशन स्थापन केलं आहे. त्या फाऊंडेशनच्या माध्यमातून जमा होणारा निधी वॉन्लेस रूग्णालयाच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

टीम इंडियाचा दौरा कधी संपणार

या माजी विद्यार्थ्यांनी तो निधी उभारण्यासाठी इंग्लंडमध्ये भारत विरूद्ध इंग्लंड असा क्रिकेटचा सामना भरविण्याचा निर्णय घेतला. हा सामना 25 जून रोजी होणार आहे. या सामान्यातून मिळणारा निधी मिरज वॉन्लेस रूग्णालयाला देण्यात येणार आहे. रूग्णालयाच्या संचालिका डॉ. प्रभा कुरेशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. भारतीय संघाचा नियोजित इंग्लंड दौरा 17 जुलैला संपणार आहे. टीम इंडियाआधी मागच्या वर्षीच्या सीरीजमधील उर्वरित एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर टी 20 आणि वनडे सीरीज असा कार्यक्रम आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.