IND vs SA : कॅप्टन वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक, एका निर्णयाने दक्षिण आफ्रिकेला झटका, नक्की काय झालं?
Vaibhav Suryavanshi IND19 vs SA19 : वैभव सूर्यवंशी याने कर्णधार म्हणून दुसऱ्याच सामन्यात आपली छाप सोडली आहे. वैभवने सहकाऱ्यावर विश्वास दाखवत त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये घेतलं. त्या खेळाडूनेही वैभवचा विश्वास सार्थ ठरवला.

वैभव सूर्यवंशी आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या यूथ वनडे सीरिजमध्ये अंडर 19 टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात केली. भारताने हा सामना जिंकल्यानंतर वैभवच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झाला. वैभव टीम इंडियाला विजयी करणारा सर्वात युवा कर्णधार ठरला. मात्र वैभवला सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही.वैभवने आतापर्यंत अनेकदा गोलंदाजांची धुलाई केलीय. त्यामुळे वैभवकडून मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र वैभवला पहिल्या सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. त्यानंतर आता वैभवने मालिकेतील आणि कर्णधार म्हणून दुसऱ्याच सामन्यात नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.
वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात घेतलेला 1 निर्णय निर्णायक ठरला. वैभवचा हा निर्णय योग्य ठरला, त्यामुळे दक्षिण आफ्रिका बॅकफुटवर गेली. वैभवने नक्की काय निर्णय घेतला? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
वैभवचा निर्णय काय?
वैभवने या सामन्याआधी मैदानाबाहेरून घेतलेल्या एका निर्णयामुळे दक्षिण आफ्रिका बॅकफुटवर गेली. वैभवचा हा निर्णय टीम निवडीबाबत होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना हा 3 जानेवारीला झाला. कॅप्टन वैभवने दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला. वैभव सूर्यवंशी याने दुसऱ्या सामन्यात हेनिल पटेल याला कायम न ठेवता त्याच्या जागी किशन सिंह याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला. वैभवचा हा निर्णय योग्य ठरला. किशनने या संधीचं सोन करत कॅप्टन वैभवचा विश्वास सार्थ ठरवला.
दक्षिण आफ्रिकेचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज ढेर
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने 35 धावांपर्यंत एकही विकेट गमावली नाही. मात्र त्यानंतर किशनने आपल्या बॉलिंगने कमाल केली. किशन दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांवर तुटून पडला. किशनने त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 22 धावांत 3 झटके दिले. एकट्या किशनने दक्षिण आफ्रिकेच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
किशनने अदनानला आऊट करत दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला. त्यानंतर किशनने त्याच्या कोट्यातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये जोरिचला आऊट केलं. किशनने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी मैदानाबाहेर पाठवली. किशनने पुन्हा आपल्या पुढील षटकात आणखी एक विकेट घेतली. किशनने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचीच शिकार केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 35-0 वरुन 57-3 असा झाला.
