USA vs IND Live Streaming: टीम इंडियाला विजयी हॅट्रिकची संधी, यजमान यूएसएचं आव्हान

United States vs India T20 World Cup 2024 Live Match Score: यूनायटेड स्टेट्स विरुद्ध टीम इंडिया एकमेकांविरुद्ध वर्ल्ड कप मोहिमेतील आपला तिसरा सामना खेळणार आहेत.

USA vs IND Live Streaming: टीम इंडियाला विजयी हॅट्रिकची संधी, यजमान यूएसएचं आव्हान
usa vs ind cricket
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 4:52 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड 2024 स्पर्धेतील 25 वा सामना हा ए ग्रुपमधील संघांमध्ये पार पडणार आहे. यजमान यूनायटेड स्टेट्स विरुद्ध टीम इंडिया यांच्यात हा सामना होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मोनांक पटेल याच्याकडे यूएसएची धुरा असणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघ अद्याप अजिंक्य आहेत. टीम इंडिया आणि यूनायटेड स्टेट्स दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.

दोन्ही संघांना विजयी हॅट्रिकची संधी आहे. तसेच जिंकणारी टीम सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. तसेच पराभवासह एका संघांची विजयी घोडदौड थांबेल. तसेच एकाप्रकारे हा सामना टीम इंडिया विरुद्ध टीम इंडिया असा असणार आहे. यूएसएच्या संघात 8 भारतीय वंशांचे खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा असणार आहे. अशात या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना बुधवारी 12 जून रोजी होणार आहे.

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे?

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे.

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहायला मिळेल.

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?

यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहता येईल.

युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.