AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पाकिस्तानविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा, विकेट पडताच अंगावर धावत गेला; पण…

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारताने पाकिस्तानला चिरडलं आणि उपांत्य फेरीत जागा मिळवली. तसं पाहिलं तर पाकिस्तानसाठी हे सोपं आव्हान होतं. पण भारताने विजय खेचून आणला. यावेळी वैभव सूर्यवंशीचं रौद्ररूप पाहायला मिळालं.

Video: पाकिस्तानविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा, विकेट पडताच अंगावर धावत गेला; पण...
Video: पाकिस्तानविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा, विकेट पडताच अंगावर धावत गेला; पण... Image Credit source: Screenshot/Hotstar
| Updated on: Feb 02, 2026 | 4:59 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीन खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे यात द्वंद्व होणार हे निश्चित होतं. नाणेफेक गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि पाकिस्तानच्या मनासारखं झालं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. या धावा पाकिस्तानला 33-3 षटकात पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण त्यांचा डाव गडगडला आणि भारताने हा सामना 58 धावांनी जिंकला. हा सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीचा पारा चढल्याचं दिसून आलं. वैभव सूर्यवंशीने आपला सगळा राग पाकिस्तानी खेळाडूवर काढला. यावेळी भारतीय खेळाडूने त्याला रोखलं आणि पुढचा प्रकार टळला.

पाकिस्तानला 33.3 षटकात आव्हान गाठणं काही जमलं नाही. त्यामुळे भारताने सामना सुरू असताना उपांत्य फेरी गाठली आणि सामन्यावर पकडही मिळली. या सामन्याच्या 37व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उपकर्णधार विहान मल्होत्रान पाकिस्तानच्या अली हसन बलोचची विकेट काढली. पाकिस्तानची ही सहावी विकेट होती. त्यामुळे पाकिस्तानचा पराभवही निश्चित झाला होता. विहान या विकेटचा आनंद साजरा करत होता. तर दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी रागाच्या भरात त्याच्या अंगावर चाल करून गेला. तेव्हा त्याला विहानने रोखलं. वैभव त्याला काही तरी बोलत होता. पण संघाच्या उपकर्णधाराने त्याला शांत केलं.

वैभव सूर्यवंशीचा पारा चढण्याचा कारण तसं स्पष्ट नाही. भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना भिडणं काही नवीन नाही. भूतकाळात अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत असं घडलं होतं. वैभव सूर्यवंशी फलंदाजी करत असताना उल जुलूल त्याला डिवचत होता. तर आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही वैभव सूर्यवंशीला स्लेजिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीने सर्व राग एका सामन्यातच काढल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे, भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 4 फेब्रुवारीला भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.