AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: Virat Kohli ला वेस्ट इंडिजमधील ODI सीरीजसाठी जबरदस्तीची रेस्ट? कोच काही तरी वेगळचं म्हणतायत

IND vs WI: इंग्लंड सीरीज नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India West indies Tour) जाणार आहे. तिथे भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे.

IND vs WI: Virat Kohli ला वेस्ट इंडिजमधील ODI सीरीजसाठी जबरदस्तीची रेस्ट? कोच काही तरी वेगळचं म्हणतायत
virat-kohli Image Credit source: instagram
| Updated on: Jul 06, 2022 | 6:16 PM
Share

IND vs WI: इंग्लंड सीरीज नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India West indies Tour) जाणार आहे. तिथे भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. वनडे सीरीजसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समिती सदस्यांनी रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली, (Virat kohli) जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या दरम्यान विराट कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी एक विधान केलं आहे. विराटला विश्रांतीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलय. विराट पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज नाहीय. विराट लवकरच जोरदार पुनरागमन करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विराटला आरामाची गरज नाही

“मी समजू शकतो की, विराट कोहली बऱ्याच काळापासून मोठी इनिंग खेळलेला नाही. पण चांगल्या खेळाडूबरोबर असं घडतं. दुसऱ्याडावात तो ज्या चेंडूवर आऊट झाला, तो कुठल्याही फलंदाजासाठी कठीण चेंडू होता. विराट पूर्णपणे व्यवस्थित आहे. त्याला आराम देण्याची गरज नाही” असं त्याचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा ANI शी बोलताना म्हणाले.

विराटने जे केलं ते दुसऱ्या कोणाला जमलेलं नाही

“विराट कोहलीने आतापर्यंत टीम इंडियासाठी जे केलय, ते दुसरं कोणी करु शकलेलं नाही. तो जोरदार पुनरागमन करेल, यावर मला विश्वास आहे” असे राजकुमार शर्मा म्हणाले. विराट कोहली मागच्या दोन वर्षात 16 कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने 29.78 च्या सरासरीने 834 धावा केल्या आहेत. या दरम्यान विराटने एकही शतक झळकावलेलं नाही. विराटने फक्त 6 अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान 4 वेळा तो शुन्यावर आऊट झालाय.

अशी आहे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे टीम

शिखर धवन (कॅप्टन), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह,

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.