AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?

भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर असून पहिल्याच सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या स्पर्धेत अभिषेक शर्माने झंझावाती खेळी केली. त्याने अर्धशतक झळकावलं आणि बॅटही वर केली. पण आता त्याच्या अर्धशतकातून एक धाव कापण्यात आली आहे.

IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?
IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 27, 2026 | 8:35 PM
Share

आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाला सहज हरवू हा आत्मविश्वास टीम इंडियाच्या अंगाशी आला. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने भारताला 38 धावांनी पराभूत करून दणका दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच पराभूत करत इतिहास रचला. तसेच भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पूर्ण 20 षटकंही खेळता आली नाही, हा दुहेरी धक्का बसला तो वेगळा.. असं असताना या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. त्याने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण आता त्याच्या खात्यातून एक धाव कमी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या खात्यातील अर्धशतक हुकलं आहे. अभिषेक शर्माने 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि 20 चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. पण आता अर्धशतक एका धावेने हुकलं असंच म्हणावं लागेल.

अभिषेक शर्माचं अर्धशतक हुकण्याचं कारण की..

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याची ही त्याची पाचवी वेळ म्हणून कौतुक करण्यात आलं. कारण या आधी कोणत्याही फलंदाजाने तीनपेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे वेगवान अर्धशतकांचा मान त्याला मिळाला होता. पण आतातून एक अर्धशतक वजा झालं आहे. सामना संपल्यानंतर धावफलकावर अभिषेकची धावसंख्या 50 ऐवजी 49 दाखवण्यात आली. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. चुकून झालं असावं असं अनेकांना वाटलं. पण त्याच्या धावसंख्येतून खरंच एक धाव वजा केल्याचं कळताच अनेकांना धक्का बसला.

अभिषेक शर्माच्या धावसंख्येत एक धाव चुकून जोडली गेली होती. ही एक धाव डावाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आली होती. पण ही धाव अभिषेकच्या बॅटने नाही तर लेग बाय होती. सामन्यानंतर ही चूक दुरूस्त करण्यात आली. त्यामुळे अभिषेक शर्मा अर्धशतकापासून वंचित राहिला. खरं तर सामना सुरू असताना अभिषेक शर्माने अर्धशतक साजरं केलं म्हणून बॅटही वर केली होती. पण आता त्याच्या खात्यात अर्धशतक नसेल हे स्पष्ट झालं आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...