AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार? या प्रश्नावर मोहम्मद शमीने थेट उत्तर दिलं की…

आयपीएल स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी मोहम्मद शमीने निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. इतकंच टी20 क्रिकेटमधील गोलंदाजीवरही त्याने थेट भाष्य केलं.

IPL 2026 : क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार? या प्रश्नावर मोहम्मद शमीने थेट उत्तर दिलं की...
IPL 2026 : क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार? या प्रश्नावर मोहम्मद शमीने थेट उत्तर दिलं की...Image Credit source: LSG Twitter
| Updated on: Mar 31, 2026 | 6:07 PM
Share

मोहम्मद शमी हे भारतीय क्रिकेटमधील चर्चेत असलेलं नाव.. पण गेल्या महिन्यात टीम इंडियात पदार्पणासाठी खूपच प्रयत्न करत आहे. मात्र त्याला काही संधी मिळताना दिसत नाही. आता आयपीएल 2026 स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची संधी आहे. आयपीएल स्पर्धेतील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील प्लेइंग 11 मध्ये मोहम्मद शमीचं नाव असणार यात काही शंका नाही. या सामन्यापूर्वीच मोहम्मद शमीने आपल्या निवृत्तिबाबतच्या चर्चांना उत्तर दिलं. या सामन्यापूर्वी त्याने कधी निवृत्ती घेणार? कधी क्रिकेट सोडणार? या प्रश्नांवर थेट भाष्य केलं. मोहम्मद शमीने सांगितलं की, जेव्हा थकेन, त्या दिवशी निवृत्ती घेईल. मोहम्मद शमी म्हणाला की, ‘मी सध्या तरी निवृत्तीबाबत विचार करत नाही. कारण तसे विचार तुम्हाला खाली खेचतात. जर तुमच्या मनात तसा विचार आला तर त्याचा अर्थ असा की तुम्ही थकला आहात. जर तुम्ही थकला म्हणजे तुम्हाला कंटाळा आला. मी आधीच स्पष्ट केलं आहे की मला कंटाळा येईल तेव्हा मी क्रिकेट सोडेन.’

लखनौ सुपर जायंट्स आयपीएल स्पर्धेत जेतेपद मिळवेल का? या प्रश्नावरही त्याने उत्तर दिलं की, लोकं काय बोलतात यामुळे मला काही फरक पडत नाही. अशी वक्तव्य करून लोकं महान होत नाहीत. शमी म्हणाला की, ‘मी जे काही आहे ते स्पष्ट बोलतो, त्याचं लोकांना वाईट वाटतं. कोणाची तुलना करून तुम्ही महान होत नाहीत. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं.’ दुसरीकडे, मोहम्मद शमीवर टी20 गोलंदाज नसल्याची टीकाही होत असते. त्यावर भाष्य करताना मोहम्मद शमी म्हणाला की, मागच्या चार पाच वर्षांचा रेकॉर्ड काढून बघा, कोणता भारतीय खेळाडू या आकड्यांचा जवळपास नाही. पण तरीही मी टी20 गोलंदाज नाही. मी मागच्या पाच सहा वरषात 130च्या जवळपास विकेट घेतल्या आहेत.

मोहम्मद शमीची आयपीएलमधील कामगिरी

मोहम्मद शमीने आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 119 सामन्यात 133 विकेट घेतल्या आहे. त्याचा इकोनॉमी रेटही 8.6 प्रति षटक आहे. पण असं असताना मागच्या पर्वात मोहम्मद शमी काही खास करू शकला नाही. त्याने 9 सामन्यात फक्त 6 विकेट घेतल्या होत्या. इतकंच काय तर 11.2 प्रति षटक इतक्या धावा दिल्या. आयपीएल 2023 मध्ये मोहम्मद शमीने 28 विकेट घेतल्या होत्या आणि पर्पल कॅप मिळवली होती.

Follow Us
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...