AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4,4,4, टीम डेव्हिडचा धमाका, विंडीज विरुद्ध स्फोटक शतक

Tim David Century : ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिड याने वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी 20i सामन्यात वादळी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावाव केले. जाणून घ्या.

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4,4,4, टीम डेव्हिडचा धमाका, विंडीज विरुद्ध स्फोटक शतक
Tim David AUS vs WI 3rd T20iImage Credit source: Screenshot/X
| Updated on: Jul 26, 2025 | 4:55 PM
Share

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळणाऱ्या टीम डेव्हिड याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात विस्फोटक शतकी खेळी करत अनेक विक्रम उद्धवस्त केले. विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 जुलैला हा सामना खेळवण्यात आला. टीमने या सामन्यातील दुसऱ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करताना झंझावाती खेळी केली. टीमने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 215 धावांचं आव्हान हे 23 चेंडूंआधी 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह टेस्टनंतर टी 20i सरिजही 3-0 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली.

टीम डेव्हीडची वादळी शतकी खेळी, अनेक रेकॉर्ड ब्रेक

टीम डेव्हिड याने पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी येत शतक झळकावलं. टीमने 37 चेंडूत नाबाद 275.68 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 102 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे टीमने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 17 चेंडूत 90 धावा केल्या. टीमने या शतकी खेळीत 11 षटकार आणि 6 चौकार लगावले. टीम यासह ऑस्ट्रेलियासाठी वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. टीमने याबाबत जोश इंग्लिस याचा रेकॉर्ड ब्रेक केला. जोशने 2024 साली स्कॉटलँड विरुद्ध 43 चेंडूत शतक केलं होतं.

मार्कस स्टोयनिसचा विक्रम उद्धवस्त

टीमने त्याआधी अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. टीम यासह मार्कस स्टोयनिस याला पछाडत ऑस्ट्रेलियासाठी वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. स्टोयनिसने 2022 च्या टी 20i वर्ल्ड कपमध्ये 17 चेंडूत अर्धशतक केलं होतं.

तसेच टीमने 11 षटकारांसह ख्रिस गेल, रोहित शर्मा यांच्यासह अनेक फलंदाजांना मागे टाकलं. टीमने ख्रिस गेल, रोहित शर्मा आणि अनेक फलंदाजांचा टी 20i सामन्यातील एका डावात 10 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. एका टी 20i सामन्यात सर्वाधिक 18 षटकारांचा विक्रम हा साहिल चौहान याच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर धमाकेदार विजय

रोहित शर्माचा रेकॉर्ड कायम

दरम्यान टीम डेव्हीडने शतक केलं. मात्र तो रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी ठरला. टीमने 3 चेंडूंआधी शतक पूर्ण केलं असतं तर रोहितचा रेकॉर्ड ब्रेक झाला असता. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक केलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.