WI vs AUS : ऑस्ट्रेलिया विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्यासाठी सज्ज, विंडीज रोखणार का?
West Indies vs Australia 3rd T20I Live Streaming : पाहुण्या ऑस्ट्रेलियाने यजमान वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेनंतर टी 20i मालिकेतील पहिले 2 सामने जिंकत विजयी पंच लगावला. ऑस्ट्रेलियाला आता या मालिकेतील तिसऱ्या आणि दौऱ्यातील सहाव्या सामन्यात विजय मिळवून सलग दुसरी मालिका जिंकण्याची संधी आहे.

पाहुण्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने यजमान वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा कसोटी मालिकेत 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने यासह विंडीज दौऱ्याची चाबूक सुरुवात केली. त्यानंतर आता उभयसंघात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने कसोटीनंतर टी 20i मालिकेतही विजयी तडाखा कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत सलग 2 सामने जिंकले आणि मालिका विजयाचा दावा ठोकला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया सलग तिसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडीजसाठी हा तिसरा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोणता संघ जिंकणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे. उभयसंघातील तिसरा सामना कुठे आणि कधी पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना केव्हा?
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना शनिवारी 26 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना कुठे?
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 4 वाजता टॉस होईल.
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना भारतात टीव्हीवर दाखवण्या येणार नाही.
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.
विंडीज ऑस्ट्रेलियाला रोखणार?
शाई होप या मालिकेत विंडीजचं नेतृत्व करत आहे. तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. विंडीजवर आधीच कसोटी मालिका पराभवाचं दडपण आहे. विंडीज त्यानंतर आता या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे विंडीज तिसर्या सामन्यात विजयाचं खातं उघडून कांगारुंना मालिका विजयापासून रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
