NED vs AFG : नेदरलँड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात या खेळाडूंवर नशिब आजमावाल! जाणून घ्या
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 34 वा सामना नेदरलँड आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? इथपासून कोणते खेळाडू चमकतील? याबाबत खलबतं सुरु आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेदरलँड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी छाप सोडली आहे. अफगाणिस्तानने तीन दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभवाची धूळ चारली आहे. तर नेदरलँडने दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत केलं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना कमी लेखणं दिग्गज संघांना महागात पडलं आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे या सामन्यातील विजय एका संघाला उपांत्य फेरीच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे क्रीडाप्रेमींना एका रोमांचक सामन्याची अनुभूती मिळेल. वनडे सामन्यात दोन्ही संघ 9 वेळा आमनेसामने आले आहेत. या त 7 सामन्यात अफगाणिस्तानला, तर 2 सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड आणि अफगाणिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे.
पिच रिपोर्ट
अफगाणिस्तान आणि नेदरलँड सामना लखनऊच्या इकाना स्पोर्ट सिटी मैदानात होणार आहे. इकाना मैदानातील खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात याची अनुभूती आली. फिरकीपटूही या मैदानावर चांगली कामगिरी करू शकतात. या मैदानावर नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करणं योग्य ठरेल. सावध सुरुवात केली तर 250 धावाही जास्त होतील. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी करणाऱ्या संघाला धावांचा पाठलाग करणं कठीण होईल.
ड्रीम इलेव्हन
- विकेटकीपर – रहमानउल्ला गुरबाज, स्कॉट एडवर्ड्स
- फलंदाज – वेस्ली बॅरेसी, रहमत शाह, इब्राहिम जद्रान
- अष्टपैलू – कॉलिन अकरमन, लोगान व्हॅन बीक (उपकर्णधार), अझमतुल्ला ओमरझाई (कर्णधार), बास डी लीडे
- गोलंदाज- (राशीद खान)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, हशमतुल्ला शाहिदी (कर्मधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, वेस्ली बॅरेसी, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकीपर), बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन
