AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL, MIW vs UPW : पलटण काय हे? यूपीकडून सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा, मुंबई 22 धावांनी पराभूत

UP Warriorz Women vs Mumbai Indians Women Match Result : गतविजेता मुंबई इंडियन्स टीमला चौथ्या मोसमात सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. युपीने या हंगामात मुंबईवर सलग आणि एकूण दुसऱ्यांदा विजय मिळवला.

WPL, MIW vs UPW : पलटण काय हे? यूपीकडून सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा, मुंबई 22 धावांनी पराभूत
UP Warriorz Women vs Mumbai Indians Women WPL 2026Image Credit source: WPL/Bcci
| Updated on: Jan 17, 2026 | 8:28 PM
Share

मुंबई इंडियन्स टीमची वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईने सलग 2 सामने जिंकत जोरदार कमबॅक केलं होतं. मात्र त्यानंतर गतविजेता संघ सातत्य राखण्यात अपयशी ठरलाय. मुंबईला एकाच संघाकडून सलग 2 वेळा पराभूत व्हावं लागलंय. यूपी वॉरियर्सने मुंबईवर 48 तासांत सलग आणि एकूण दुसऱ्यांदा मात केली आहे. युपीचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला आहे. यूपीला पहिल्या 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र त्यानंतर युपीने जोरदार कमबॅक केलंय.

यूपीने 15 जानेवारीला मोसमातील आठव्या सामन्यात मुंबई टीमवर 7 विकेट्सने मात केली होती. त्यानंतर उभयसंघातील एकूण दुसऱ्या तर मोसमातील दहाव्या सामन्याचं आयोजन हे शनिवारी 17 जानेवारीला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. युपीने या सामन्यात मुंबईवर 22 धावांनी मात करत विजय मिळवला. युपीने मुंबईसमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 165 धावाच करता आल्या.

सामन्यात काय झालं?

मुंबईने टॉस जिंकून युपीला बॅटिंगसाठी बोलावलं. यूपीने 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 187 धावा केल्या. यूपीसाठी कॅप्टन मेग लॅनिंग हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मेगने 45 चेंडूत 70 धावा केल्या. फोबी लिचफिल्ड हीने 37 बॉलमध्ये स्फोटक 61 रन्स केल्या. तसेच हर्लिन देओल हीने 25 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून एमेलिया कीर हीने 3 तर नॅट सायव्हर ब्रँट हीने 2 विकेट्स घेतल्या.

मुंबईची बॅटिंग

मुंबईचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज 188 धावांचा पाठलाग करताना सपशेल अपयशी ठरले. मुंबईच्या पहिल्या 5 पैकी 4 फलंदाजांना 20 पार मजल मारता आली नाही. तर एकीला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हॅली मॅथ्यू 13, सजीवन सजना 10, नॅट सायव्हर ब्रँट 15 आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर 18 धावा करुन बाद झाल्या. त्यामुळे मुंबईची 11 ओव्हरमध्ये 5 आऊट 69 अशी स्थिती झाली होती.

त्यानंतर एमेलिया केर आणि अमनजोत कौर या जोडीने सहाव्या विकेटसाठी फक्त 45 बॉलमध्ये 83 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे मुंबईच्या विजयाच्या आशा वाढल्या. या जोडीकडून मुंबईला आशा होती. मात्र ही जोडी फुटली. अमनजोत कौर 24 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरच्या जोरावर 41 रन्स केल्या. तर केर नाबाद परतली. केर मुंबईला विजयी करण्यात अपयशी ठरली. केरने नाबाद 49 धावा केल्या. तर जी कामालिनी हीने 9 धावा जोडल्या. युपीसाठी शिखा पांडे हीने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल.
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद.
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.