Test Cricket : सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स, बुमराहनंतर या गोलंदाजाचा कारनामा, कोण आहे तो?
Test Cricket : भारताचा वेगवान आणि मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह याने इंग्लंड दौऱ्यात सलग 2 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. आता त्यानंतर एका गोलंदाजाने बुमराहसारखाच कारनामा केला आहे.

टीम इंडियाने अवघ्या काही दिवसांपूर्वी यजमान इंग्लंडवर पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताने यासह इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्कलोडमुळे या मालिकेतील फक्त 3 सामन्यांमध्येच खेळला. बुमराह या मालिकेत भारताला एकही सामन्यात विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने प्रतिस्पर्ध्यांना रोखून ठेवलं. बुमराहने सलग 2 सामन्यांमध्ये 5-5 विकेट्स घेतल्या. आता बुमराहनंतर आणखी एका गोलंदाजाने अशीच कामगिरी केलीय. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हॅनरी याने झिंब्बावे विरुद्ध एकाच मालिकेत सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केलीय.
मॅटने बुलावायोत आयोजित दुसर्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी 7 ऑगस्टला हा कारनामा केला. झिंबाब्वेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. झिंबाब्वेला पहिल्या डावात 150 पारही पोहचता आलं नाही. मॅटने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने झिंबाब्वेला 48.5 ओव्हरमध्ये 125 रन्सवर ऑलआऊट केलं.
मॅटने पहिल्या डावात एकूण 15 ओव्हर बॉलिंग केली. मॅटने या दरम्यान 2.70 च्या इकॉनॉमी रेटने 40 धावा देत झिंबाब्वेच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर झॅकरी फॉल्क्स याने 4 विकेट्स घेत मॅटला चांगली साथ दिली. मॅट आणि झॅकरी या दोघांनीच झिंबाब्वेला झटपट गुंडाळलं. विशेष म्हणजे झॅकरीने पदार्पणात ही कामगिरी केली.
सलग दुसऱ्यांदा ‘पंजा’
मॅटची कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही सहावी वेळ ठरली. तसेच मॅटने या मालिकेत सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी करुन दाखवली. मॅटने बुलावायोत आयोजित पहिल्या कसोटी सामन्यातही 5 विकेट्स मिळवल्या होत्या. मॅटने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 3 असे एकूण 9 विकेट्स घेतल्या. मॅटने अशाप्रकारे या मालिकेतील 3 डावात आतापर्यंत एकूण 14 विकेट्स घेतल्या आहेत.
मॅटचा सलग दुसऱ्या सामन्यातही पंजा
Back-to-back 5-wicket hauls from Matt Henry 🤩
Matt Henry bags his sixth Test five-for today, and his second in consecutive matches. Scorecard | https://t.co/DnWSGE9t8b #ZIMvNZ #CricketNation 📷 = Zimbabwe Cricket pic.twitter.com/gs1TW4ZcJk
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 7, 2025
न्यूझीलंड 49 धावांनी आघाडीवर
दरम्यान न्यूझीलंडने झिंबाब्वेला झटपट गुंडाळल्यानंतर पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 49 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने 39 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत. विल यंग 74 धावांवर बाद झाला. तर डेव्हॉन कॉनव्हे 79 आणि जेकब डफी 8 धावांवर नाबाद आहेत.
