‘IPL दरम्यान माझ्यावर बलात्कार..’, क्रिकेटर यश दयालचा पाय पुन्हा खोलात, आणखी एका तरूणीची फिर्याद
Yash Dayal rape case : प्रसिद्ध क्रिकेटपटू यश दयालच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता जयपूरमध्ये आणखी एका मुलीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसत आहे. . आयपीएल 2025 दरम्यान जयपूरमधील एका हॉटेलमध्ये आपल्यावर बलात्कार झाला, असा आरोप या मुलीने केला आहे.

क्रिकेटर यश दयाल याच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. त्याच्या विरोधात आणखी एका तरूणीने आता बलात्काराची तक्रान नोंदवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच यश दयलाचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो. नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणात आता जयपूरमधील सांगानेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यातचे आमिष दाखवण्यात आले. तसेच तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यात आले आणि दोन वर्षे तिच्यावर बलात्कार करण्यात आला असा त्या मुलीचा आरोप आहे. पीडित मुलीने एफआयआरमध्ये पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळत असताना ती यश दयालच्या संपर्कात आली.
दोन वर्षांपूर्व पीडित तरूणी ही अल्पवयीन होती, तेव्हाच जयपूरमध्ये तिची यश दयालशी ओळख झाली. आयपीएलची मॅच खेळण्यासाठी यश हा तेव्हा जयपूरला आला होता. तेव्हा क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल टिप्स देण्याच्या बहाण्याने यश दयलाने आपल्याला हॉटेलमध्ये बोलावले होते, असा दावा त्या तरूणीने केला. तसेच आयपीएल-2025 च्या सामन्यादरम्यान तिला सीतापूरमधील एका हॉटेलमध्ये बोलावून देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
यापूर्वी, पीडिता 17 वर्षांची अल्पवयीन होती जेव्हा तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी यश दयालविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर देखील नोंदवला आहे.
यश दयाल विरुद्ध पहिला FIR कुठे दाखल ?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळणारा क्रिकेटपटू यश दयाल याच्याविरुद्ध जुलैमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता. गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलिस ठाण्यात हा एफआयआर नोंदवण्यात आला होता. आपल्याला लग्नाचं खोटे आश्वासन देऊन आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केलं असा आरोप त्या मुलीने यशवर केला होता.
कोण आहे यश दयाल ? क्रिकेट कारकीर्द कशी ?
यश दयाल हाँ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल 2025 च्या विजेत्या संघाचा भाग होता आणि त्याने 5 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. तो 2022 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सदस्यही होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेश संघाकडून खेळतो.
बांगलादेश मालिका आणि बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते, परंतु त्याला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. 27 वर्षीय यश दयालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 27 सामन्यांमध्ये 84 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 5/48 आहे.
List A क्रिकेटमध्ये, त्याने 23 सामन्यांमध्ये 23.86 च्या सरासरीने 36 विकेट्स घेत प्रभाव दाखवला. तर 71 T20 क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने 66 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी 3/20 आहे. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2 संघांसाठी 43 सामने खेळताना 41 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 9.57 आहे आणि स्ट्राईक रेट 21.2 आहे. तो आयपीएलच्या 2022 आणि 2023 च्या हंगामात गुजरातकडून खेळला होता, तर 2024 आणि 2025 च्या आयपीएल हंगामात तो आरसीबीच्या संघाचा भाग होता.
