CSK vs SRH, IPL 2021 Match 23 Result | ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसचे अर्धशतक, चेन्नईचा विजयी पंच, हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय

| Updated on: Apr 29, 2021 | 10:21 AM

CSK vs SRH Live Score, IPL 2021 | सनरायजर्स हैदराबादसमोर चेन्नई सुपर किंग्सचे तगडे आव्हान

CSK vs SRH, IPL 2021 Match 23 Result | ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसचे अर्धशतक, चेन्नईचा विजयी पंच, हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय
CSK vs SRH 2021 Live Score Marathi | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने

दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिसने 56 धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले.  या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium Delhi) करण्यात आले होते. (csk vs srh score ipl 2021 match chennai super kings vs sunrisers hyderabad scorecard online arun jaitley stadium delhi in marathi)

Key Events

चेन्नईचा सलग 5 वा विजय

चेन्नईने हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली. यासह चेन्नईने या मोसमातील सलग 5 वा विजय साकरला. चेन्नईची या मोसमाची सुरुवात पराभवाने झाली. मात्र त्यानंतरच्या सर्व सामन्यात चेन्नईने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या विजयासह चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसची शानदार सलामी भागीदारी

विजयी धावांचे पाठलाग करताना चेन्नईची धमाकेदार सुरुवात झाली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस या सलामी जोडीने चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. यो दोघांनी 129 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने 75 तसेच फॅफने 56 धावांची खेळी केली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Apr 2021 11:06 PM (IST)

    चेन्नईचा विजयी पंच

    चेन्नईने हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिसने 56 धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. चेन्नईचा हैदराबाद विरुद्धचा हा सलग 5 वा विजय ठरला. या विजयासह चेन्नईने पॉइंट्सटेबलमध्ये बंगळुरुला पछाडत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • 28 Apr 2021 10:43 PM (IST)

    चेन्नईला सलग 2 धक्के

    राशिद खानने चेन्नईला सलग 2 धक्के दिले आहेत. राशिदने मोईन अली पाठोपाठ फॅफ डु प्लेसीसला आऊट केलं आहे.

  • 28 Apr 2021 10:37 PM (IST)

    चेन्नईला दुसरा झटका

    चेन्नईने दुसरी विकेट गमावली आहे. राशिद खानने मोईन अलीला केदार जाधवच्या हाती कॅच आऊट केलं आहे. मोईनने 15 धावा केली.

  • 28 Apr 2021 10:29 PM (IST)

    चेन्नईला पहिला झटका

    दमदार सुरुवातीनंतर चेन्नईने पहिली विकेट गमावली आहे. फटकेबाजी करत असलेला ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. गायकवाडला राशिद खानने बोल्ड केलं. गायकवाडने 44 चेंडूत 12 चौकारांसह 75 धावांची शानदार खेळी केली . 

     
     
  • 28 Apr 2021 10:22 PM (IST)

    ऋतुराज गायकवाडचे शानदार अर्धशतक

    फॅफ डु प्लेसिसच्या मागोमाग ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. गायकवाडच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 5वं अर्धशतक ठरलं. 
     
     
  • 28 Apr 2021 10:18 PM (IST)

    फॅफ डु प्लेसिस-ऋतुराज गायकवाड सलामी जोडीची शतकी भागीदारी

    फॅफ डु प्लेसिस-ऋतुराज गायकवाड सलामी जोडीची शतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. यासह  फॅफने अर्धशतकही पूर्ण केलं.  फॅफच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 19 वं अर्धशतक ठरलं.

  • 28 Apr 2021 10:07 PM (IST)

    चेन्नईचा 9 ओव्हरनंतर स्कोअर

    चेन्नईने 9 व्या ओव्हरमध्ये 17 धावा चोपल्या आहेत. यासह चेन्नईचा स्कोअर 9 ओव्हरनंतर बिनबाद 84 धावा केल्या आहेत. यामुळे चेन्नईला विजयासाठी आणखी 11 ओव्हरमध्ये 88 धावांची आवश्यकता आहे.

  • 28 Apr 2021 09:54 PM (IST)

    चेन्नईची धडाक्यात सुरुवात, पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 50 धावांपर्यंत मजल

    चेन्नईच्या सलामीवीरांनी धडाक्यात सुरुवात केली आहे. फॅफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 50 धावांची नाबाद भागीदारी रचत विजयाच्या दिशेने कूच केली आहे.

  • 28 Apr 2021 09:48 PM (IST)

    चेन्नईचा 5 ओव्हरनंतर स्कोअर

    चेन्नईच्या फॅफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे. या दोघांनी पहिल्या 5 ओव्हरमध्ये 43 धावा जोडल्या आहेत.

  • 28 Apr 2021 09:38 PM (IST)

    चेन्नईची शानदार सुरुवात

    चेन्नईची शानदार सुरुवात झाली आहे. फॅफ डु प्लेसीस आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21 धावा केल्या आहेत.

  • 28 Apr 2021 09:26 PM (IST)

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. चेन्नईला  विजयासाठी 172 धावांची आवश्यकता आहे.

  • 28 Apr 2021 09:16 PM (IST)

    चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान

    हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. हैदराबादकडून मनिश पांडेने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 57 धावा केल्या. तसेच केन विलियमनसनने 26 धावांची छोटेखानी खेळी केली.

  • 28 Apr 2021 09:06 PM (IST)

    19 व्या ओव्हरमधून 20 धावा

    केन विलियमसनने 19 व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर 3 चौकार आणि 1 सिक्ससह 20 धावा फटकावल्या आहेत.

  • 28 Apr 2021 09:00 PM (IST)

    फॅफ डु प्लेसीसचा शानदार कॅच, मनिष पांडे आऊट

    हैदराबादने तिसरी विकेट गमावली आहे.  फॅफ डु प्लेसीसने हवेत झेप घेत मनिष पांडेचा सुंदर कॅच घेतला आहे. मनिष पांडेने 46 चेंडूत 61 धावांची खेळी केली.

  • 28 Apr 2021 08:57 PM (IST)

    हैदराबादला मोठा धक्का

    हैदराबादला मोठा धक्का बसला आहे.  झुंजार अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आऊट कॅच आऊट झाला आहे. वॉर्नरने 55 चेंडूत 3 फोर आणि 2 सिक्ससह 57 धावांची खेळी केली.

  • 28 Apr 2021 08:53 PM (IST)

    दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे.  या शतकी भागीदारीदरम्यान दोघांनी आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं.

  • 28 Apr 2021 08:50 PM (IST)

    डेव्हिड वॉर्नरचा खणखणीत सिक्स, अर्धशतक पूर्ण

    डेव्हिड वॉर्नरने16 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर 77 मीटरचा खणखणीत सिक्स लगावला. या सिक्ससह वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केलं. वॉर्नरसाठी हे अर्धशतक खासं ठरलं. वॉर्नरच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलं. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच  फलंदाज ठरला.

  • 28 Apr 2021 08:45 PM (IST)

    15 व्या ओव्हरमधून 11 धावा

    हैदराबादने 15 व्या ओव्हरमध्ये  11 धावा केल्या आहेत.यामध्ये डेव्हिड वॉर्नरने सिक्स लगावला. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर वॉर्नरने दुहेरी धाव घेतली. यासह वॉर्नरच्या टी 20 क्रिकेटमधील 10 हजार धावा पूर्ण झाल्या.

  • 28 Apr 2021 08:39 PM (IST)

    मनिष पांडेचे अर्धशतक

    हैदराबादचा आक्रमक फलंदाज मनिष पांडेने शानदार अर्धशत झळकावलं आहे.  जाडेजाने 35 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं.

  • 28 Apr 2021 08:35 PM (IST)

    मनिष पांडेचा चौकार, हैदराबादच्या 100 धावा पूर्ण

    मनिष पांडेने 14 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर चौकार लगावला. यासह हैदराबादच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.

  • 28 Apr 2021 08:23 PM (IST)

    वॉर्नरचा चौकार, दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे या जोडीने  दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. डेव्हिड वॉर्नरने 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. यासह या जोडीची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली.

  • 28 Apr 2021 08:17 PM (IST)

    मनिष पांडेचा जोरदार सिक्स

    मनिष पांडेने 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर जोरदार सुपर सिक्स लगावला आहे.

  • 28 Apr 2021 08:16 PM (IST)

    हैदराबादचा 9 ओव्हरनंतर स्कोअर

    हैदराबादने 9 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 59 धावा केल्या आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर सावधपणे खेळत आहे. तसेच संधी मिळेल तसं वॉर्नर फटके लगावत आहे. वॉर्नरसोबत मनिष पांडे खेळत आहे.

  • 28 Apr 2021 08:01 PM (IST)

    हैदराबादचा पावर प्लेमधील स्कोअर

    हैदराबादने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे मैदानात खेळत आहेत.

  • 28 Apr 2021 07:50 PM (IST)

    हैदराबादला पहिला धक्का

    हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. जॉनी बेयरस्टो आऊट झाला आहे. बेयरस्टोने 7 धावा केल्या.

  • 28 Apr 2021 07:43 PM (IST)

    सामन्यातील पहिला चौकार वॉर्नरच्या बॅटने

    हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला आहे.

  • 28 Apr 2021 07:41 PM (IST)

    धोनीकडून जॉनी बेयरस्टोला जीवनदान

    विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीने सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर जीवनदान दिलं आहे. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर लेग स्टंपवर असलेल्या चेंडूवर बेयरस्टोने फिल्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटला स्पर्श करुन धोनीच्या दिशेने गेला. पण धोनीने सहज सोपा कॅच सोडला.

  • 28 Apr 2021 07:33 PM (IST)

    सनरायजर्स हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात

    सनरायजर्स हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो ही सलाम जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 28 Apr 2021 07:31 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये ड्वेन ब्राव्हो आणि इम्रान ताहीरच्या जागी लुंगी एनगिडी आणि मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. तर हैदराबादमध्ये संदीप शर्मा आणि मनिष पांडेचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

  • 28 Apr 2021 07:14 PM (IST)

    सनरायजर्स हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू

    डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, जगदीशन सुचित, केदार जाधव, विजय शंकर, मनीष पांडे, केन विलियमसन, खलील अहमद, संदीप शर्मा, राशिद खान आणि सिद्धार्थ कौल.

  • 28 Apr 2021 07:13 PM (IST)

    चेन्‍नई सुपर किंग्‍सची प्लेइंग इलेव्हन

    महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) , ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्‍लेसी, लुंगी एन्गिडी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, सॅम करन, मोईन अली, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

  • 28 Apr 2021 07:03 PM (IST)

    सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला

    सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 28 Apr 2021 06:51 PM (IST)

    चेन्नई विरुद्ध हैदराबाद आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 28,2021 11:06 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.