DC vs PBKS, IPL 2021 Match 11 Result | ‘गब्बर’ शिखर धवनची शानदार खेळी, दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

| Updated on: Apr 18, 2021 | 11:22 PM

DC vs PBKS 2021 Live Score | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने

DC vs PBKS, IPL 2021 Match 11 Result | 'गब्बर' शिखर धवनची शानदार खेळी, दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय
DC vs PBKS 2021 Live Score | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने

मुंबई :  दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लाने 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 92 धावांची शानदार खेळी केली. तर पृथ्वी शॉने 32 धावा केल्या. तर मार्क्स स्टोयिनसने नाबाद 27 धावांची खेळी केली. (dc vs pbks live score ipl 2021 match delhi capitals vs punjab kings scorecard online wankhede stadium mumbai in marathi)

DC vs PBKS लाईव्ह स्कोअरकार्डसाठी क्लिक करा. 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Apr 2021 11:19 PM (IST)

    दिल्लीचा 6 विकेट्सने दणदणीत विजय

    दिल्लीने पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लाने 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 92 धावांची शानदार खेळी केली. तर पृथ्वी शॉने 32 धावा केल्या. तर मार्क्स स्टोयिनसने नाबाद 27 धावांची खेळी केली.

  • 18 Apr 2021 11:10 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता

    दिल्लीला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता

  • 18 Apr 2021 11:07 PM (IST)

    दिल्लीला चौथा धक्का

    दिल्लीला चौथा धक्का बसला आहे.  कर्णधार रिषभ पंत आऊट झाला आहे.

  • 18 Apr 2021 11:05 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 16 धावांची आवश्यकता

    दिल्लीला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 16 धावांची आवश्यकता

  • 18 Apr 2021 11:03 PM (IST)

    स्टोयनिसचा शानदार सिक्स

    मार्क्स स्टोयनिसने फ्री हीटचा चांगला फायदा उचलला आहे. मोहम्मद शमीने 17 व्या ओव्हरमधील तिसरा चेंडू नो बोल टाकल्याने फ्री हीट मिळाला. या फ्री हीटवर स्टोयनिसने सिक्स लगावला.

  • 18 Apr 2021 10:55 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 36 धावांची आवश्यकता

    दिल्लीला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार रिषभ पंत आणि मार्कस स्टोयनिस मैदानात खेळत आहेत.  सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

  • 18 Apr 2021 10:51 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 44 धावांची आवश्यकता

    दिल्लीला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार रिषभ पंत आणि मार्कस स्टोयनिस मैदानात खेळत आहेत.

  • 18 Apr 2021 10:49 PM (IST)

    दिल्लीला तिसरा धक्का

    दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. सलामीवीर शिखर धवन 92 धावा करुन माघारी परतला आहे. अवघ्या 8 धावांनी शिखर धवनचे शतक हुकले.

  • 18 Apr 2021 10:41 PM (IST)

    गब्बरचे सलग 3 चौकार

    गब्बर शिखर धवनने सलग 3 चेंडूत 3 चौकार लगावले आहेत.

  • 18 Apr 2021 10:37 PM (IST)

    दिल्लीचा 13 ओव्हरनंतर स्कोअर

    दिल्लीने 13 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 125 धावा केल्या आहेत. शिखर धवन 78 आणि कर्णधार रिषभ पंत 4 धावांवर खेळत आहेत. दिल्लीला विजयासाठी 42 चेंडूत 71 धावांची आवश्यकता आहे.

  • 18 Apr 2021 10:23 PM (IST)

    दिल्लीला दुसरा धक्का

    दिल्लीला दुसरा धक्का बसला आहे. स्टीव्ह स्मिथ आऊट झाला आहे.

  • 18 Apr 2021 10:20 PM (IST)

    दिल्लीच्या 100 धावा पूर्ण

    दिल्लीच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. दिल्लीने 61 चेंडूत म्हणजेच 10.1 ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा गाठला आहे.

  • 18 Apr 2021 10:19 PM (IST)

    दिल्लीचा 10 ओव्हरनंतर स्कोअर

    दिल्लीने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 99 धावा केल्या आहे. मैदानात शिखर धवन 58 आणि स्टीव्ह स्मिथ 8 धावांवर नाबाद खेळत आहेत. दिल्लीला विजयासाठी आणखी  60 चेंडूत 97 धावांची आवश्यकता आहे.

  • 18 Apr 2021 10:16 PM (IST)

    'गब्बर' धवनचे शानदार अर्धशतक

    'गब्बर' शिखर धवनने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. धवनने 31 चेंडूंच्या मदतीने ही अर्धशतक झळकावलं आहे.

  • 18 Apr 2021 10:10 PM (IST)

    शिखरचा शानदार फोर

    शिखर धवनने 8 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर फोर लगावला आहे. यासह धवन 37 धावांवर पोहचला आहे. तर 8 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोअर 1 आऊट 75 असा झाला आहे. दिल्लीला विजयासाठी 12 ओव्हरमध्ये 121 धावांची आवश्यकता आहे.

  • 18 Apr 2021 10:06 PM (IST)

    दिल्लीचा 7 ओव्हरनंतर स्कोअर

    दिल्लीने पहिल्या 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 68 धावा केल्या आहेत. शिखर धवन 32 तर स्टीव्ह स्मिथ 3 धावांवर खेळत आहेत.

  • 18 Apr 2021 09:57 PM (IST)

    दिल्लीला पहिला धक्का

    चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीला पहिला झटका बसला आहे. लोकल बॉय पृथ्वी शॉ आऊट झाला आहे. पृथ्वीने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 सिक्ससह 32 धावांची खेळी केली.

  • 18 Apr 2021 09:52 PM (IST)

    पृथ्वी शॉ-शिखर धवन सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

    दिल्लीच्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामी जोडीने दिल्लीला चांगली सुरुवात दिली आहे. या ओपनर जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 18 Apr 2021 09:47 PM (IST)

    पृथ्वीचा क्लासिक सिक्स

    पृथ्वी शॉने चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शानदार सिक्स लगावला आहे. यासह पृथ्वी 31 धावांवर पोहचला आहे.

  • 18 Apr 2021 09:44 PM (IST)

    दिल्लीची जबरदस्त सुरुवात

    दिल्लीच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 33 धावा जोडल्या आहेत. पृथ्वी 20 तर शिखर 11 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 18 Apr 2021 09:32 PM (IST)

    शिखर धवनचा पहिला चौकार

    दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून खातं उघडलं आहे.

  • 18 Apr 2021 09:19 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 196 धावांचे आव्हान

    पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 धावा केल्या. पंजाबच्या सलामी जोडीने शानदार कामगिरी केली. मयंक अग्रवालने सर्वाधिक 69 तर कर्णधार के एल राहुलने 61 धावांची खेळी केली.

  • 18 Apr 2021 09:08 PM (IST)

    पंजाबला चौथा धक्का

    पंजाबला चौथा धक्का बसला आहे. निकोलस पूरन आऊट झाला आहे.

  • 18 Apr 2021 09:02 PM (IST)

    पंजाबच्या 18 ओव्हरनंतर 170 धावा

    पंजाबने 18 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून  170 धावा केल्या आहेत.

  • 18 Apr 2021 08:56 PM (IST)

    पंजाबला तिसरा धक्का

    पंजाबला तिसरा धक्का बसला आहे. ख्रिस वोक्सने ख्रिस गेलला रिपल पटेलच्या हाती कॅच आऊट केलं. गेलने 11 धावा केल्या.

  • 18 Apr 2021 08:54 PM (IST)

    फ्री हीटवर गेलचा सिक्स

    ख्रिस गेलने फ्री हीटचा पुरेपुर फायदा घेतला आहे. ख्रिस वोक्सने 17 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू नो बॉल टाकला. त्यामुळे फ्री हीट मिळाला. या फ्री हीटवर गेलने सिक्स लगावला.

  • 18 Apr 2021 08:50 PM (IST)

    पंजाबला दुसरा धक्का

    पंजाबने दुसरी विकेट गमावली आहे. कर्णधार के एल राहुल आऊट 61 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 18 Apr 2021 08:46 PM (IST)

    पंजाबच्या 15 ओव्हरनंतर 140 धावा

    पंजाबने 15 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 140 धावा केल्या आहेत. मैदानात के एल राहुल आणि ख्रिस गेल खेळत आहेत. त्यामुळे ही जोडी उर्वरित 5 ओव्हरमध्ये किती धावा जोडतात, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

  • 18 Apr 2021 08:42 PM (IST)

    के एल राहुलला मार्कस स्टोयनिसकडून जीवनदान

    मार्कस स्टोयनिसने के एल राहुलला जीवनदान दिलं आहे.

  • 18 Apr 2021 08:38 PM (IST)

    कर्णधार के एल राहुलचे संयमी अर्धशतक पूर्ण 

    कर्णधार के एल राहुलने संयमी अर्धशतक पूर्ण केलं आहे. 6 चौकार आणि 1 सिक्ससह अर्धशतक लगावलं आहे.

  • 18 Apr 2021 08:34 PM (IST)

    पंजाबला पहिला धक्का

    लुकमन मेरीवालाने आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. मेरीवालाने सेट बॅट्समन मयंक अग्रवालला आऊट केलं आहे. मयंकने 36 चेंडूत 7 चौकार 4 षटकारांसह 69 धावांची खेळी केली.

  • 18 Apr 2021 08:21 PM (IST)

    मयंकचे सलग 2 सिक्स

    मयंक अग्रवालने सलग 2 चेंडूत कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर 2 सिक्स लगावले आहेत. यासह पंजाबने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच 100 धावांची सलामी भागीदारीही पूर्ण झाली आहे.

  • 18 Apr 2021 08:19 PM (IST)

    मयंक अग्रवालचे शानदार अर्धशतक

    मयंक अग्रवालने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. मयंकच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 8 वं अर्धशतक ठरलं आहे.

  • 18 Apr 2021 08:00 PM (IST)

    पंजाबच्या पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 59 धावा

    पंजाबने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 59 धावा केल्या आहेत.

  • 18 Apr 2021 07:56 PM (IST)

    पंजाबच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

    पंजाबची शानदार सुरुवात झाली आहे. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 18 Apr 2021 07:48 PM (IST)

    मयंकची शानदार सुरुवात

    पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवालने शानदार सुरुवात केली आहे. मंयकने 11 चेंडूत 5 चौकार 1 सिक्ससह नाबाद 28 धावा चोपल्या आहेत.

  • 18 Apr 2021 07:42 PM (IST)

    स्टीव्ह स्मिथकडून केएल राहुलला जीवनदान

    स्टीव्ह स्मिथने केएल राहुलला  जीवनदान दिलं आहे. लुकमन मेरीवाला सामन्यातील दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर केएलने मारलेला फटका स्टीव्हच्या दिशेने गेला. मात्र स्टीव्हने सोपा कॅच सोडला. त्यामुळे केएलला जीवनदान मिळालं.

  • 18 Apr 2021 07:32 PM (IST)

    पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात

    पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. के एल राहुल आणि मयंक अग्रवाल सलामी जोडी मैदानात खेळत आहे. दिल्लीने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे.

  • 18 Apr 2021 07:18 PM (IST)

    पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन

    केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, जाय रिचर्डसन, जलज सक्सेना, मोहम्मद शमी, राइली मेरिडिथ आणि अर्शदीप सिंह

  • 18 Apr 2021 07:14 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन

    पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत, मार्कस स्टोयनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, अवेश खान, लुकमान मेरीवाला

  • 18 Apr 2021 07:11 PM (IST)

    नाणेफेक जिंकून दिल्लीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

    नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 18 Apr 2021 05:55 PM (IST)

    आकडेवारी कोणाच्या बाजूने?

    उभयसंघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब वरचढ राहिली आहे. पंजाबने दिल्लीवर 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे.

  • 18 Apr 2021 05:54 PM (IST)

    दिल्ली विरुद्ध पंजाब आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 11 व्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 18,2021 11:19 PM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.