AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : चौथ्या टेस्टसाठी प्लेइंग-11 ची घोषणा, 8 वर्षानंतर या खेळाडूच टीममध्ये कमबॅक

ENG vs IND : भारत आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरीज सुरु आहे. या मालिकेत एकूण पाच सामने खेळले जाणार आहेत. मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे 23 जुलैपासून मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरु होत आहे. सध्या सीरीजमध्ये इंग्लिश टीम 2-1 ने आघाडीवर आहे.

ENG vs IND : चौथ्या टेस्टसाठी प्लेइंग-11 ची घोषणा, 8 वर्षानंतर या खेळाडूच टीममध्ये कमबॅक
England TeamImage Credit source: PTI
| Updated on: Jul 22, 2025 | 12:01 PM
Share

भारताविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर असलेल्या यजमान इंग्लंडने चौथ्या टेस्टसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इंग्लंडने टेस्टच्या 24 तास आधी नाही, तर 43 तास आधी 11 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. मँनचेस्टरच्या ऑल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये 23 जुलैपासून टेस्ट सीरीजमधील चौथा सामना खेळला जाणार आहे. त्यासाठी इंग्लंड टीमने आपल्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल केला आहे. जवळपास 8 वर्षानंतर स्पिनर लियम डॉसनचा टीममध्ये समावेश झाला आहे.

इंग्लंडने लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाला 22 धावांनी हरवून सीरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. या मॅचमध्ये इंग्लंडसाठी शेवटचा विकेट स्पिनर शोएब बशीरने घेतला होता. पण बशीरचा हा विकेट या सीरीजमधला त्याचा शेवटचा विकेट ठरला. कारण बोटाला झालेल्या दुखापतीमुळे सीरीजचे उर्वरितून सामने त्याला खेळता येणार नाहीयत. इंग्लंडच्या सिलेक्टर्सनी चौथ्या आणि पाचव्या टेस्टसाठी डावखुर स्पिन ऑलराऊंडर लियम डॉसनचा टीममध्ये समावेश केला आहे.

त्याची गोष्ट करुण नायरसारखी

इंग्लंडच्या टीमने डॉसनच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. खराब फॉर्म असूनही ओपनर जॅक क्रॉली, उपकर्णधार ऑली पोप आणि वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स यांना संधी मिळाली आहे. 35 वर्षाच्या डॉसनची गोष्ट भारतीय टीमचा फलंदाज करुण नायरसारखी आहे.

15 वेळा एकाडावात 5 विकेट

नायर प्रमाणे डॉसनने सुद्धा 2016 साली भारत-इंग्लंड टेस्ट सीरीजमधून डेब्यू केला होता. पण तीन सामन्यानंतर 2017 साली तो टीममधून बाहेर गेला. त्यानंतर आता ज्या पद्धतीने नायरने इंग्लंड सीरीजसाठी टीममध्ये कमबॅक केलय. तशीच इंग्लिश स्पिनर डॉसनला दुसरी संधी मिळाली आहे. डॉसनने 3 कसोटी सामन्यात 84 धावा करण्याशिवाय 7 विकेट घेतलेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 212 सामन्यात त्याने 10731 धावा केल्यात. यात 18 सेंच्युरी आहेत. त्याशिवाय 371 विकेट आहेत. त्यात 15 वेळा एकाडावात 5 विकेट घेतलेत.

इंग्लंडची प्लेइंग 11

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, लियम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.