AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भल्याभल्यांना जमली नाही ती कामगिरी जेम्स अँडरसन करणार, सचिन तेंडुलकरचा ‘तो’ रेकॉर्ड तोडणार?

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या (James Anderson) निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे जो आणखी कुणीही तोडला नाही. (England james Anderson Can Break Sachin tendulkar record)

भल्याभल्यांना जमली नाही ती कामगिरी जेम्स अँडरसन करणार, सचिन तेंडुलकरचा 'तो' रेकॉर्ड तोडणार?
जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर
| Updated on: Jun 01, 2021 | 7:47 AM
Share

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) याच्या क्रिकेटमधील रेकॉर्डची चर्चा नेहमीच होत असते. सचिन तेंडुलकरच्या अनेक रेकॉर्डसनी किर्तीमान रचलेत. आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या (James Anderson) निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे जो आणखी कुणीही तोडला नाही. रिकी पाँटिंग (Ricky ponting), अलास्टर कुक (Alaster Cook) आणि स्टीव्ह वॉ (steve waugh) यांच्यासारख्या दिग्गजांनाही तो तोडता आला नाही. आता भारताच्या इंग्लंड दौऱ्यात जेम्स अँडरसन तो रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. (England james Anderson Can Break Sachin tendulkar record)

काय आहे रेकॉर्ड?

सचिन तेंडुलकरने त्याच्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 94 सामने त्याने भारतीय खेळपट्टीवर खेळले.आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला सचिनएवढे स्वदेशी खेळपट्टीवर सामने खेळता आले नाही. सचिनचा हा रेकॉर्ड जेम्स अँडरसनला खुणावतोय. तो सचिनचा हाच रेकॉर्ड नजीकच्या दोन महिन्यात तोडू शकतो.

कसा तोडणार रेकॉर्ड?

अँडरसनने मायदेशी खेळपट्टीवर आतापर्यंत 89 सामने खेळले आहेत. म्हणजेच सचिनएवढे सामने स्वदेश खेळपट्टीवर खेळायला त्याला आणखी 7 सामने खेळण्याची गरज आहे. म्हणजेच तो स्वदेशी खेळपट्टीवर 94 सामने खेळून पूर्ण करेल. यासरशी तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा महत्त्वपूर्ण रेकॉर्ड आपल्या नावावर करेल.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जातोय. भारतीय संघाला इंग्लंडविरद्ध 5 सामन्यांची खेळायची आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडशी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर हे सामने पार पडल्यानंतर न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या निमित्ताने भारतीय संघासमोर उभा ठाकणार आहे.

…तर सचिनचा रेकॉर्ड मोडित?

म्हणजेच अँडरनसला जर सचिनचा रेकॉर्ड तोडायचा असेल तर त्याला न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने तसंच भारताविरुद्धचे पाचही कसोटी सामने खेळायला लागतील. जर तो हे सातही सामने खेळला तर तो मायदेशात 94 सामने खेळेल आणि सचिनचा रेकॉर्ड आपल्या नावे करेल.

भल्याभल्यांना रेकॉर्ड तोडायला जमला नाही…!

सचिन पाठोपाठ सर्वांत जास्त मायदेशी सामने खेळण्याचा मान ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंगने मिळवलाय. त्याने 92 सामने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळले. त्यापाठोपाठ इंग्लंडचा जेम्स अँडरसन, अ‍ॅलिस्टर कुक आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी 89 सामने आपल्या मायभूमीवर खेळले. आता कूक आणि वॉ दोघेही रिटायर झालेत. पण 39 वर्षीय अँडरनस अजूनही आपल्या बोलिंगने भल्याभल्या बॅट्समनला धडी भरवतोय. त्याला सचिनचा हा रेकॉर्ड तोडण्याची नामी संधी आहे.

(England james Anderson Can Break Sachin tendulkar record)

हे ही वाचा :

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

ऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतताच गर्लफ्रेंडकडून गोड बातमी, म्हणते ‘कुणी तरी येणार येणार गं…!’

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.