13 षटकार, 7 चौकार, 28 बॉलमध्ये धडाकेबाज शतक, मैदानात वादळ, 10 ओव्हरमध्ये धावांचा डोंगर!

युरोपियन क्रिकेट लीगमध्ये एका फलंदाजाने 28 चेंडूत झंझावाती शतक झळकावलं आहे. या फलंदाजाने आपल्या खेळीत 10 उत्तुंग षटकार आणि 7 चौकार खेचले. सलामीला आलेल्या अहमद मुसाद्दिकने शेवटपर्यंत खेळपट्टीवर पाय रोवून प्रतिस्पर्धी संघाला हैरान केलं. | european cricket series Ahmed musaddiq

13 षटकार, 7 चौकार, 28 बॉलमध्ये धडाकेबाज शतक, मैदानात वादळ, 10 ओव्हरमध्ये धावांचा डोंगर!
european cricket series

मुंबई : युरोपियन क्रिकेट लीगमध्ये एका फलंदाजाने 28 चेंडूत झंझावाती शतक झळकावलं आहे. या फलंदाजाने आपल्या खेळीत 10 उत्तुंग षटकार आणि 7 चौकार खेचले. सलामीला आलेल्या अहमद मुसाद्दिकने शेवटपर्यंत खेळपट्टीवर पाय रोवून प्रतिस्पर्धी संघाला हैरान केलं. kummerfelder कडून खेळताना अहमद मुसद्दीकने thcc hamburg विरूद्ध हा पराक्रम केला. अहमद मुसद्दिकने (Ahmed musaddiq) युरोपियन क्रिकेट मालिकेच्या इतिहासात 28 चेंडूत शतक झळकावून सर्वात वेगवान शतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याने भारतीय वंशाचा फलंदाज गौहर माननचा विक्रम मोडला. गौहरने क्लूज क्रिकेट क्लब विरुद्ध 29 चेंडूत शतक ठोकलं होतं.(european cricket series Ahmed musaddiq hits 28 ball Hundred kummerfelder Sportverein vs thcc hamburg)

मैदानाच्या चारही कोपऱ्यात मनाला वाटेल तसे फटके!

32 वर्षीय अहमदने पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. त्याने 33 चेंडूत 115 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे कुम्फेलडर स्पोर्टवेरेनने दोन विकेट्स गमावून 198 धावा केल्या. मुसद्दिकने त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 13 षटकार ठोकले म्हणजे फक्त 20 चेंडूत त्याने 106 धावा फटकावल्या.

त्याने टीएचसीसी हॅमबर्गच्या सर्वळ्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. मनाला वाटेल तसे मैदानाच्या चारही कोपऱ्यात शॉट्स लगावले. पहिल्याच षटकातून अहमद मुसद्दिकने आक्रमक रुप धारण करुन आपण काय करणार आहोत., याची झलक दाखवली. अभिनंद झाच्या ओव्हरमध्ये 26 धावा केल्या. त्यानंतर, मुसद्दीकचे आपल्या बॅटचे झटके सुरुच ठेवले. त्याने फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना देखील आपल्या बॅटने तडाखा दिला.

13 चेंडूत अर्धशतक

डावाच्या पाचव्या षटकात मुसद्दिकने बहराम अलीच्या ओव्हरमध्ये सलग चार षटकार ठोकले आणि 13 चेंडूत अर्धशतक ठोकले. या दरम्यान त्याने सहकारी फलंदाजासह 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारीही केली. अहमद मुसद्दिकने नवव्या षटकात एक धाव घेऊन आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.

पण तोपर्यंत त्याने 33 चेंडूत 115 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय शोएब आजम खानने 13 चेंडूत तीन चौकार व तीन षटकारांसह 32 धावा केल्या तर दिलराज सिंगने 14 चेंडूत चार चौकार व तीन षटकारांसह नाबाद 40 धावा केल्या. टीएचसीसी हॅम्बर्गच्या अभिक जनाला सर्वाधिक धावा काढल्या गेल्या. त्याने दोन षटकांत 42 धावा देत एक विकेटही घेतली.

145 धावांनी पराभव!

198 चा पाठलाग करताना टीएचसीसी हॅमबर्गचे फलंदाज ढेपाळले. त्यांचे केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. निर्धारित 10 षटकांत संघाला सात गडी राखून केवळ 53 धावा करता आल्या. अशा प्रकारे टीएचसीसीला 145 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

(european cricket series Ahmed musaddiq hits 28 ball Hundred kummerfelder Sportverein vs thcc hamburg)

हे ही वाचा :

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, ‘भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण…’

भारताचा श्रीलंका दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा?