AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण, वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत जिंकले दोन वर्ल्ड कप, 26 वर्षी क्रिकेटला रामराम, महिला क्रिकेटपटूचं वादळी आयुष्य!

Former England Bowler Isha guha birthday Cricket Career

16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण, वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत जिंकले दोन वर्ल्ड कप, 26 वर्षी क्रिकेटला रामराम, महिला क्रिकेटपटूचं वादळी आयुष्य!
इशा गुहा
| Updated on: May 21, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई :  वयाच्या 16 व्या वर्षी तिने इंग्लंडच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आठ वर्षांच्या आत, वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत दोन विश्वचषक आणि अॅशेस मालिका जिंकल्या. कारकीर्दीत यशाचा आलेख बहरत असताना वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी निवृत्ती घेऊन तीने क्रिकेटला गुडबाय म्हटलं. नंतर, माइक हाती घेऊन कॉमेन्ट्री केली आणि इथेही आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा रोवला. आम्ही तुम्हाला आज इंग्लंडची माजी क्रिकेटपटू ईशा गुहा (Isha Guha) हिच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल सांगत आहेत. कारणही तसंच खास आहे, ती आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करतीय. (Former England Bowler Isha guha birthday Cricket Career)

इशाची ओळख

21 मे 1985 रोजी इंग्लंडच्या बकिंगघमशर इथे तिचा जन्म झाला. ईशाचे आई वडील मूळचे बंगालचे आहेत. पण 1970 च्या दशकात ते इंग्लंडले गेले. इशा इंग्लंडकडून आठ कसोटी सामने, 83 एकदिवसीय सामने आणि 22 टी -20 सामने खेळली. तिने 11 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. एकदिवसीय सामन्यांत 101 विकेट्स तर 8 कसोटीत 29 विकेट्स तिने मिळवल्या. इंग्लंड क्रिकेट संघात स्थान मिळविणारी ती आशियाई वंशाची पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

युरोपियन चँपियनशिपच्या माध्यमातून पदार्पण

ईशाने वयाच्या 16 व्या वर्षी 2001 मध्ये महिला युरोपियन चँपियनशिपच्या माध्यमातून पदार्पण केले. ती मध्यम वेगवान गोलंदाज होती. तेव्हापासून ईशाने तिच्या गोलंदाजीची जादू दाखवायला सुरुवात केली. 2004 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिने 22 धावा देऊन 5 बळी घेतले आणि इंग्लंडला मालिका जिंकवण्यास मोलाची मदत केली.

भारताविरोधात शानदार कामगिरी

त्यानंतर 2006 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिने पाच विकेट्स मिळवल्या. तर एकदिवसीय मालिकेत आठ विकेट्स मिळवल्या. पुढच्या वर्षी ईशाने संस्मरणीय कामगिरी करत सगळ्यांना चकित केलं. अॅशेस मालिकेमध्ये तिने 100 धावा देऊन 9 गडी बाद केले आणि इंग्लंडला करंडक जिंकवून दिला.

दोन वर्ल्ड जिंकले, नंबर एकची बोलर बनली!

विश्वचषकातील तिची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. तिने स्पर्धेत केवळ चार विकेट घेतल्या परंतु इंग्लंडचा संघ विजेता ठरला. यासह, ईशा विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग बनली. यादरम्यान, ती आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचली. ईशा गुहा 2009 मध्ये वर्ल्ड टी -20 जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा सदस्यदेखील राहिली. अशाप्रकारे, वयाच्या केवळ 24 व्या वर्षी तिने महिला क्रिकेटमधील जवळजवळ सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या.

(Former England Bowler Isha guha birthday Cricket Career)

हे ही वाचा :

IPL स्थगितीमुळे निराश क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी, गेल-रसेल-पोलार्डचं वादळ पुन्हा घोंघावणार, तारीख ठरली!

टीम इंडियाचा सर्वांत जास्त शिकलेला क्रिकेटर, ज्याला भारताचा ग्रेन मॅक्ग्रा म्हटलं गेलं, पण पुढे…

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, 19 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात, पाहा कसा असेल दौरा! वा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.