Kapil Dev ODI XI | टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय टीम

या बेस्ट इलेव्हन संघात टीम इंडियाच्या आजी माजी खेळाडूंचा समावेश आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:00 PM, 24 Nov 2020
Former India captain Kapil Dev's best ODI team

मुंबई : टीम इंडियाचे (Team India Former Captain Kapil Dev)  माजी कर्णधार कपिल देव. कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वात 1983 मध्ये पहिल्यांदाच भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. कपिल देव यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील  (Kapil Dev ODI XI) सर्वोत्कृष्ट टीम निवडली आहे. अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमात कपिल देव सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी संघाची निवड केली. या दरम्यान त्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं  ( Mahendra Singh Dhoni) कौतुक केलं. कपिल देव यांच्या संघात टीम इंडियाच्या आजी माजी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच 2011 च्या वर्ल्ड कपविजेत्या संघातील काही खेळाडूंचाही समावेश आहे. former india captain kapil dev best odi team

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

“कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फरक असतो. माझ्या एकदिवसीय संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड आणि युवराज सिंह हे खेळाडू निश्चित असतील. याशिवाय वेगवान गोलंदाज म्हणून झहीर खान, एस श्रीसंत यांचा समावेश असेल. जसप्रीत बुमराह गेल्या काही काळापासून दमदार कामगिरी करतोय. याशिवाय अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह सारख्या दिग्गज फिरकीपटूंचाही समावेश आहे”, असं कपिल देव म्हणाले.

कपिल देव धोनीबाबत काय म्हणाले?

कपिल देव यांनी या संघात महेंद्रसिंह धोनीला विकेटकीपर म्हणून स्थान दिलंय. धोनी सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. धोनीची जागा कोणताच खेळाडू घेऊ शकत नाही, अशा शब्दात कपिल देव यांनी धोनीचं कौतुक केलं.

अशी आहे बेस्ट इलेव्हन टीम : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड, महेंद्र सिंह धोनी युवराज सिंह, झहीर खान, एस श्रीसंत, जसप्रीत बुमराह, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह

दरम्यान कपिल देव यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर देव यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली होती.

कपिल देव यांची कारकीर्द

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.

संबंधित बातम्या :

Kapil Dev | कपिल देव यांची प्रकृती ठणठणीत, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

former india captain kapil dev best odi team