Hardik Pandya-Mahieka Sharma : जरा तरी माणुसकी बाळगा… हार्दिक पंड्या भडकला, महिका शर्माच्या Video मुळे गदारोळ !
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या खूप संतापला आहे.माहिका शर्मा हिच्या एका व्हिडीओमुळे मोठा गदारोळ माजला असून त्यामुळे हार्दिकच्या रागाचा पारा चढला आहे. असं नेमकं झालं तरी काय ?

Mahieka Sharma Controversy : भारतीय संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या नेहमी चर्चेत असतो. तसा तो नेहमी कूल मूडमध्ये असतो, सोशल मीडियावरही तो बिनधास्तपणे त्याचे फोटो शेअर करतो. मात्र सध्या हार्दिक पंड्याचं एक दुसरंच रूप पहायला मिळत आहे. हार्दिक पंड्या प्रचंड रागावला आहे आणि या रागाचे कारण त्याची प्रेयसी माहिका शर्मा आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यानंतर हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर काही फोटो जर्नलिस्टविरुद्ध नाराजी व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. गर्लफ्रेंड माहिका शर्मा मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना चुकीच्या अँगलने शूटिंग करण्यात आलं आणि तिचे चुकीच्या अँगलने फोटो काढले गेले असा हार्दिक पंड्याने आरोप केला.
हार्दिक पंड्या संतापला
त्यानंतर हार्दिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या अकाऊंटवरून एक लांबलचक पोस्ट लिहीत, स्टोरी शएअर केली आहे. ” तुम्ही सार्वजनिक जीवनात असता तेव्हा लोकांच्या नजरा तुमच्यावर असतात. मी या आयुष्याचा स्वीकार केला आहे, पण आज असं काही घडलं ज्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माहिका ही वांद्रे येथील एका रेस्टॉरंटच्या पायऱ्या उतरून खाली येत होती, मात्र तिथे असलेल्या पापाराझींनी एका अशा अँगलने तिचा व्हिडीओ बनवला जो कणत्याही महिलेसाठी योग्य नाही. एका खासगी क्षणाला खळबळजनक रूप देण्यात आलं. प्रत्येक महिलेला सन्मान हवा असतो आणि प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असे. मीडियातील माझे भाऊ खूप मेहनत करतात याची मला कल्पना आहे, पण मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की जरा काळजी घ्या. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कॅप्चर करणं योग्य नसतं. सगळे अँगल (शूट करणं) गरजेचं नाही. जरा माणुसकीने वागा” अशा शब्दांत हार्दिकने फोटो ग्राफर्सना फटकारलं आहे.
Hardik Pandya’s Instagram story. pic.twitter.com/GGuLKNe4GO
— Tanuj (@ImTanujSingh) December 9, 2025

कुठे आहे हार्दिक पंड्या ?
सध्या हार्दिक पंड्या हा टीम इंडियासोबत कटक मध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 5 टी 20 सामन्यांपैकी पहिलासामना कटकमध्ये खेलवला जाणार आहे. हा पंड्याचा कॅमबॅक सामनना आहे. आशिया कपमध्ये दुखापत झाल्यानंतर हार्दिक पंड्या 2 महीने संघाबाहेर होता. आता तो पुन्हा संघात आला असून मॅच खेळणार आहे.
