IND vs PAK : जेवण न करताच मोहम्मद शमी पाकिस्तानचा करणार गेम; कोणता नवस बोलला?
ICC Champions Trophy 2025 : आज भारत आणि पाकिस्तान हायहोल्टेज सामना होईल. दुपारी होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद शमी पाकिस्तान टीमला गारद करतो की नाही याची चर्चा रंगली आहे.

भारत आणि पाकिस्तान या परंपरागत हाडवैऱ्यात आज हायहोल्टेज सामना होत आहे. दुपारी सामना होईल. त्यापूर्वीच टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानला आपल्या भेदक माऱ्याने तो गारद करेल अशी अटकळ बांधली जात असतानाच शमीकडून एक मोठे वक्तव्य आले आहे. पाकिस्तानचा गेम करण्यासाठी शमीने नवस बोलला आहे का? त्याची का होत आहे चर्चा?
मोहम्मद शमीने घटवले 9 किलो वजन
मोहम्मद शमीने वजन कमी करण्याचा नवस बोलला आहे. अर्थात तो त्याच्या फिटनेससाठी आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले. त्याने माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंह सिद्धु यांना मुलाखत दिली. ‘वजन कमी करणे आणि कर्जातून स्वत:ची सूटका करून सर्वात कठीण आहे. तुम्ही 5 ते 6 किलो वजन कसे घटवले’, असा प्रश्न सिद्धू यांनी शमीला विचारला. पण मध्येच सिद्धूंना थांबवत शमीने थेट उत्तर दिले. ‘पाजी 9 किलो वजन कमी केले. स्वतःला आव्हान देणे हे सर्वात कठीण काम आहे.’ असे शमी म्हणाला. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत NCA मध्ये होतो तेव्हा आपले वजन 90 किलोपर्यंत वाढल्याचे तो म्हणाला.
10 वर्षांपासून कडक डाएट
नवजोत सिंह सिद्धू यांच्याशी चर्चा करताना शमी याने अजून एक मोठे वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्याने अनेकांना प्रेरणा दिली. ‘मी मिठाईपासून चार हात लांब आहे. चटपटीत खाद्यपदार्थ माझ्या मेनूत नाहीत. कधी कधी बिर्याणी ताव मारतो.’ असे तो म्हणाला. 2015 पासून तो केवळ रात्रीच जेवण करतो. ना तो सकाळी नाश्ता करतो, ना दिवसभरात जेवतो, असे त्याने सांगताच सर्वांनाच धक्का बसला. इतके कडक डाएट करणारे फार कमी लोक आहेत. त्यात शमीचा पण समावेश आहे. इतरांना हे अशक्य वाटते, पण मला त्याची सवय झाल्याचे, तो म्हणाला.
न खाताच करणार पाकिस्तानचा गेम
मोहम्मद शमीने बांग्लादेशविरोधातील सामन्यात जोरदार गोलंदाजी केली. त्याने बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्याने पाच विकेट घेतला. आज दुबईत पाकिस्तानविरोधात शमीला कसे चकवायचे आणि त्याच्या भेदक गोलंदाजीचा कसा सामना करायचा याकडे पाक संघाचे नियोजन सुरू आहे. तर शमी जेवण न करताच मैदानावर उतरणार आहेत. अर्थात तो फळ खाणार आहे.
