मला 7 षटकं आधीच ‘क्लायमॅक्स’ माहित होता: विजय शंकर

नागपूर: अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने भारताला नागपूर वन डेत आश्चर्यकारक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना विजय शंकरने दोन फलंदाजांना बाद केलं आणि विजय खेचून आणला. भारताने दिलेलं 251 धावांचं आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाची सर्वबाद 242 अशी दाणादाण उडाली. विजय शंकरने निर्णायक ठरलेल्या अखेरच्या षटकात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. या विजयासोबतच …

मला 7 षटकं आधीच ‘क्लायमॅक्स’ माहित होता: विजय शंकर

नागपूर: अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने भारताला नागपूर वन डेत आश्चर्यकारक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना विजय शंकरने दोन फलंदाजांना बाद केलं आणि विजय खेचून आणला. भारताने दिलेलं 251 धावांचं आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाची सर्वबाद 242 अशी दाणादाण उडाली. विजय शंकरने निर्णायक ठरलेल्या अखेरच्या षटकात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. या विजयासोबतच भारताने भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

विराटचं 40 वं शतक, ‘हे’ पाच विक्रम मोडीत

दरम्यान, या सामन्यात विजय शंकरने टाकलेली शेवटची ओव्हर निर्णायक ठरली. हा सामना संपल्यानंतर विजय शंकरने सांगितलं की, 43 व्या षटकातच मला समजलं होतं की शेवटची ओव्हर आपल्याला टाकायची आहे. त्यामुळे मी आधीपासूनच तयारीला लागलो होतो, असं त्याने सांगितलं.

कोहलीकडे पर्याय नव्हता, धोनीने पर्याय दिला

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज होती. अशावेळी विराट कोहलीकडे गोलंदाजीचा पर्याय नव्हता. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या हुकमी गोलंदाजांची 10-10 षटकं पूर्ण झाली होती. त्यामुळे केदार जाधव आणि विजय शंकर हे दोन पर्याय कोलहीसमोर होते.

अशावेळी शेवटची ओव्हर द्यायची कोणाला असा पेच निर्माण झाला. त्यावेळी कर्णधार कोहलीने टीम इंडियाचा आधारस्तंभ धोनीशी चर्चा केली. कोहलीने धोनीकडे बॉल टाकला आणि धोनीने तो विजय शंकरच्या हाती सोपवला.

यानंतर विजय शंकरने पहिल्याच चेंडूवर टिच्चून खेळणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला पायचित बात करुन ऑस्ट्रेलियाला दणका दिला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अडम झाम्पाच्या त्रिफळा उडवून विजयने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अष्टपैलू विजय शंकर

विजय शंकर हा तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तामिळनाडूचं कर्णधारपद भूषवलं आहे. दिनेश कार्तिकही विजयच्या नेतृत्त्वात खेळला. त्याच्या नावे अनेक शतकं आहेत.

संबंधित बातम्या 

भारताचा ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी विजय, विजय शंकरची अष्टपैलू कामगिरी 

चाहता भेटायला आला, धोनी पळायला लागला, मैदानातच पकडापकडी  

विराटचं 40 वं शतक, ‘हे’ पाच विक्रम मोडीत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *