India vs England 3rd Test 1st Day Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 3 बाद 99 धावा, रोहित-अजिंक्य मुंबईकर जोडी मैदानात

| Updated on: Feb 24, 2021 | 10:26 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) तिसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

India vs England 3rd Test 1st Day Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 3 बाद 99 धावा, रोहित-अजिंक्य मुंबईकर जोडी मैदानात
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) तिसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी (India vs England 3rd Test Live)  सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळवलं आहे. दिवसखेर भारताने 3 विकेट्स गमावून 99 धावा केल्या.  रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात नाबाद खेळत आहेत.  रोहित शर्माने दिवसखेर भारताकडून सर्वाधिक नाबाद 57  धावा केल्या. तर  शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या रुपात भारताने 3 विकेट् गमावल्या. त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव  112 धावांवर गुंडाळला.  भारताकडून  अक्षर पटेलने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. अनुभवी आर अश्विनने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्मालाही 1 विकेट मिळाली. दरम्यान रोहित आणि रहाणे दुसऱ्या दिवशी कशाप्रकारे सुरुवात करतात, याकडे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे. (india vs england 2021 3rd test day 1 live cricket score updates online in marathi at motera cricket stadium ahmedabad) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

पहिल्या दिवसखेर टीम इंडियाच्या 3 बाद 99 धावा

पहिल्या दिवसखेर भारताने 3 विकेट्स गमावून 99 धावा केल्या आहेत. दिवसखेर  रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात नाबाद खेळत आहेत.  रोहित शर्माने दिवसखेर भारताकडून सर्वाधिक नाबाद 57  धावा केल्या. तर  शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या रुपात भारताने 3 विकेट्स गमावल्या.

इंग्लंडच्या पहिल्या डावात 112 धावा

इंग्लंडने पहिल्या डावात 112 धावा केल्या. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक धावा केल्या. क्रॉलीने 84 चेंडूत 10 चौकारांसह 53 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 24 Feb 2021 10:08 PM (IST)

    पहिल्या दिवसखेर टीम इंडियाच्या 3 बाद 99 धावा

    अहमदाबादमधील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.  टीम इंडियाने पहिल्या डावात दिवसखेर 3  विकेट्स गमावून  99 धावा केल्या. दरम्यान त्याआधी टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडला पहिल्या डावात 112 धावांवर गुंडाळलं. पहिल्या डावात लोकल बॉय अक्षर पटेलने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. अक्षरची कसोटीमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली. तर आर अश्विनने 3 विकेट घेत अक्षरला चांगली साथ दिली. तर इशांत शर्माने आपल्या 100 व्या सामन्यात 1 विकेट मिळवली.

  • 24 Feb 2021 10:02 PM (IST)

    टीम इंडियाला तिसरा धक्का

    पहिल्या दिवसातील तिसऱ्या सत्राअखेरीस टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे.  विराट 27 धावांवर बाद झाला.

  • 24 Feb 2021 09:46 PM (IST)

    कॅप्टन विराटला जीवनदान

    टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला 24 धावांवर जीवनदान मिळालं आहे.  जेम्स अँडरसन टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 30 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर विराटने मारलेला फटका ओली पोपच्या दिशेने गेला. पण पोपने सहज सोपा कॅच सोडला. यामुळे विराटला 24 धावांवर जीवनदान मिळालं.

  • 24 Feb 2021 09:35 PM (IST)

    तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा सलग बाद झाल्याने भारताची 34 बाद 2 अशी स्थिती झाली होती. मात्र यानंतर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला.

  • 24 Feb 2021 09:24 PM (IST)

    रोहित शर्माचे अर्धशतक

    टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने 63 चेंडूत शानदार अर्धशतक लगावलं आहे. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 12 वं अर्धशतक ठरलं आहे.

  • 24 Feb 2021 09:03 PM (IST)

    स्टोक्सच्या बोलिंगवर विराटचा जोरदार चौकार

    विराटने 21 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर  जोरदार चौकार लगावला.

  • 24 Feb 2021 09:00 PM (IST)

    टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण

    टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात खेळत आहे.

  • 24 Feb 2021 08:36 PM (IST)

    गिलनंतर पुजारा माघारी

    टीम इंडियाने एकामागोमाग एक असे 2 विकेट्स गमावले आहेत. शुबमन गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा शून्यावर एलबीडबल्यू आऊट झाला. जॅक लीचने पुजारा बाद केलं.

  • 24 Feb 2021 08:30 PM (IST)

    टीम इंडियाला पहिला धक्का

    टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र फटका अचूक बॅट वर न बसल्याने शुबमन 11 धावा करुन माघारी परतला.

  • 24 Feb 2021 08:22 PM (IST)

    रोहित-शुबमनची आश्वासक सुरुवात

    सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने सावध सुरुवात केली आहे. ही जोडी मैदानात सेट झाली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी संघर्ष करावा लागत आहे.

  • 24 Feb 2021 07:41 PM (IST)

    चौकाराने तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात

    रोहित शर्माने तिसऱ्या सत्रातील खेळाला चौकार मारुन  सुरुवात केली आहे. रोहितसोबत शुबमन गिल मैदानात खेळत आहेत. दरम्यान इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 112 धावा केल्या आहेत.

  • 24 Feb 2021 07:01 PM (IST)

    दुसऱ्या सत्रापर्यंत टीम इंडियाच्या बिनबाद 5 धावा

    टीम इंडियाने दुसऱ्या सत्रापर्यंत बिनबाद 5 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात नाबाद आहेत. दरम्यान त्या आधी टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 112 धावांवर गुंडाळला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.

  • 24 Feb 2021 06:49 PM (IST)

    रोहितचा शानदार चौका

    रोहित शर्माने सामन्याच्या चौथ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉर्डच्या गोलंदाजावीवर दमदार चौकार लगावला.

  • 24 Feb 2021 06:40 PM (IST)

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात खेळत आहे. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर आटोपला.

  • 24 Feb 2021 06:22 PM (IST)

    इंग्लंडच्या पहिल्या डावात 112 धावा

    इंग्लंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या फिरकीसमोर लोटांगण घातलं आहे. भारताच्या अक्षर पटेल आणि रवीचंद्नन अश्विन या जोडीने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांमध्ये गुंडाळला आहे. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर अक्षर पटेलने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने एक विकेट घेतली.

  • 24 Feb 2021 06:09 PM (IST)

    इंग्लंडला नववा धक्का, अक्षर पटेलच्या पाच विकेट्स

    इंग्लंडने नववी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने स्टुअर्ट ब्रॉडला आऊट केलं आहे. यासह अक्षरने पाच विकेट्स घेतल्या आहेत. सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची अक्षरची ही दुसरी वेळ ठरली आहे.

  • 24 Feb 2021 05:36 PM (IST)

    इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण

    इंग्लडने 8 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या  बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड मैदानात खेळत आहेत.

  • 24 Feb 2021 05:34 PM (IST)

    इंग्लंडला आठवा धक्का

    इंग्लंडने आठवी विकेट गमावली आहे. अश्विनने जॅक लीचला चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 24 Feb 2021 05:25 PM (IST)

    वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोना, 4 कर्मचाऱ्यांनाही लागण

    वाशिम : जिल्ह्यातील देगांव परिसरातील आदिवासी निवासी शाळेमधील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, 4 कर्मचाऱ्यांना ही लागण, 13 ते 15 वयोगटातील बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी,अचलपूर आणि मेळघाट पट्टयातील भागातील असून 14 फेब्रुवारी रोजी ते शाळेत दाखल झाले होते. सर्व विद्यार्थ्यांची RTPCR टेस्ट करण्यात आल्यानंतर संसर्गाचा उलगडा, निवासी शाळेमुळे मोठ्या प्रमाणात पसरला संसर्ग

  • 24 Feb 2021 05:20 PM (IST)

    इंग्लंडला सातवा धक्का

    फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने इंग्लंडला सातवा धक्का दिला आहे. अक्सरने जोफ्रा आर्चरला आऊट केलं आहे. यामुळे  इंग्लंडची 93-7  अशी स्थिती झाली आहे.

  • 24 Feb 2021 05:05 PM (IST)

    टीम इंडियाची फिरकी, इंग्लंडला गिरकी, गमावली सहावी विकेट

    इंग्लंडने ओली पोपनंतर बेन स्टोक्सची विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने स्टोक्सला 6 धावांवर एलबीडब्लयू आऊट केलं आहे.  यामुळे इंग्लंडची 81-6 अशी स्थिती झाली आहे.

  • 24 Feb 2021 04:59 PM (IST)

    ओली पोप आऊट, इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

    टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रातील खेळाला झोकात सुरुवात केली आहे. टी ब्रेकनंतर अश्विनने ओली पोपला बोल्ड आऊट केलं आहे. यामुळे इंग्लंडची बिकट स्थिती झाली आहे. इंग्लंडने ओली पोपची विकेट गमावल्याने 5 बाद 81 अशी स्थिती झाली आहे.

  • 24 Feb 2021 04:45 PM (IST)

    पहिल्या सत्रावर टीम इंडियाचे वर्चस्व

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. या पहिल्या सत्रावर भारताने वर्चस्व राखलं. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात इंग्लंडला एकूण 4 झटके दिले. यामुळे इंग्लंडची 81-4 अशी स्थिती झाली आहे.

    चहापानापर्यंत इंग्लंडचा स्कोअर 

    इंग्लंड : 81-4 (27 Overs)

    बेन स्टोक्स - 6* (19)

    ओली पोप  -1*  (8)

  • 24 Feb 2021 04:38 PM (IST)

    सरपंचांना मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त कायदे माहिती : नारायण राणे

    शरद पवारांच्या कृपेमुळे सरकार बसलं आहे. नाहीतर त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं असतं का कोणी?, या राज्यातील सरपंचांना मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त कायदे माहिती आहेत,

  • 24 Feb 2021 04:32 PM (IST)

    इंग्लंडला चौथा धक्का

    इंग्लंडला चौथा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने इंग्लंडचा सेट बॅट्समन झॅक क्रॉलीला एलबीडबल्यू आऊट केलं. झॅकने 84 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 53 धावा केल्या.

  • 24 Feb 2021 04:16 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा धक्का

    इंग्लंडने तिसरी विकेट गमावली आहे. फिरकीपटू आर अश्विनने इंग्लंडचा कॅप्टन जो रुटला 17 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आहे. रुटने 17 धावा केल्या.

  • 24 Feb 2021 04:01 PM (IST)

    झॅक क्रॉलीचे शानदार अर्धशतक

    सलामीवीर झॅक क्रॉलीने शानदार अर्धशतक लगावलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथं अर्धशतक ठरलं आहे.

  • 24 Feb 2021 03:25 PM (IST)

    संजय राठोड मंत्रालयाकडे रवाना

    थोड्याच वेळात मंत्रीमंडळाची बैठक सुरु होणार, वनमंत्री संजय राठोड मंत्रालयाकडे रवाना, संजय राठोड मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार

  • 24 Feb 2021 03:10 PM (IST)

    इंग्लंडला दुसरा धक्का

    लोकल बॉय फिरकीपटू अक्सर पटेलने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. अक्सरने जॉनी बेयरस्टोला एलबीडबल्यू बाद केलं आहे. जॉनी शून्यावर बाद झाला.

  • 24 Feb 2021 02:48 PM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का

    100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. इशांतने डॉम सिबलेला स्लिपमध्ये  रोहित शर्माच्या हाती शून्यावर कॅच आऊट केलं.

  • 24 Feb 2021 02:38 PM (IST)

    मेडन ओव्हरने सामन्याला सुरुवात

    सामन्यातील पहिली ओव्हर 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने टाकली. इशांतने मेडन ओव्हर टाकत शानदार सुरुवात केली.

  • 24 Feb 2021 02:33 PM (IST)

    राष्ट्रपतींकडून दोन्ही संघाची भेट

    सामना सुरु होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही संघाची भेट घेतली. यावेळेस टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी राष्ट्रपतींनी नमस्कार केलं. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने राष्ट्रपती कोविंद यांच्याशी आपल्या संघातील खेळाडूंची तोंड ओळख करुन दिली.

  • 24 Feb 2021 02:29 PM (IST)

    इशांत शर्माचा विशेष सत्कार

    इंग्लंड विरुद्धचा तिसरा कसोटी सामना हा  इशांत शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. इशांतसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. या कामगिरीसाठी इशांतचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी विशेष सत्कार केला. यावेळेस इशांतला एक स्पेशल कॅप देण्यात आली.

  • 24 Feb 2021 02:26 PM (IST)

    तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडमध्ये 4 बदल

    तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडमध्ये 4 बदल करण्यात आले आहेत. टीममध्ये जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर आणि जॉनी बेयरस्टोचे पुनरागमन झाले आहे.

    इंग्लंड प्लेइंग इलेवन : जो रूट (कर्णधार), डॉम सिब्ले, जॅक क्रॉले, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.

  • 24 Feb 2021 02:16 PM (IST)

    तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया

    रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.

  • 24 Feb 2021 02:13 PM (IST)

    तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात 2 बदल

    इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद सिराजच्या जागी यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला संघात स्थान मिळालं आहे. बुमराहसाठी हा सामना खास असणार आहे. मोटेरा स्टेडियम हे बुमराहचं होम ग्राऊंड आहे. यामुळे बुमराहकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

  • 24 Feb 2021 02:03 PM (IST)

    इंग्लंडचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

    मोटेराच्या स्टेडियमवर पाहुण्या इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टीम इंडिया प्रथम फिल्डिंग करणार आहे.

    इंग्लंडने टॉस जिंकला

  • 24 Feb 2021 02:00 PM (IST)

    राष्ट्रपतींकडून दोन्ही संघाना शुभेच्छा

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या खेळाडूंना या तिसऱ्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 24 Feb 2021 01:58 PM (IST)

    इशांत शर्माचा 100 वा कसोटी सामना

    इंग्लंड विरुद्धचा तिसरा कसोटी सामना हा इशांत शर्माच्या कसोटीतील 100 वा कसोटी सामना ठरणार आहे. इशांत शर्मा टीम इंडियाकडून 100 कसोटी खेळणारा 11 वा खेळाडू तर कपिल देव यांच्यानंतर दुसरा वेगवाग गोलंदाज ठरणार आहे.

  • 24 Feb 2021 01:48 PM (IST)

    राष्ट्रपतींच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन

    भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटेरा स्टेडियमचे उद्घाटन केले. यावेळेस गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू देखील तेथे उपस्थित होते. थोड्याच वेळात भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

Published On - Feb 24,2021 10:08 PM

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.