AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेताच लोकांसाठी खास मेसेज

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना लस घेतल्याचं सांगितलं आहे. (Virat kohli take Corona Vaccine Appeal People For Vaccination)

विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेताच लोकांसाठी खास मेसेज
कर्णधार विराट कोहली लस घेताना
| Updated on: May 10, 2021 | 2:18 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना लस घेतल्याचं सांगितलं आहे. कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोरोना लस घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. लस घेतल्याबरोबर त्याने आपल्या चाहत्यांना देखील शक्य असेल तितक्या लवकर लस घेण्याचं आवाहन केलंय. (Indian Captain Virat kohli take Corona Vaccine Appeal People For Vaccination)

इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडू घेतायत लस

भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन, मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मानंतर विराट कोहलीने देखील आज लस घेतली.  इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत.

शिखर, रहाणे, इशांतने घेतली लस

आयपीएल स्थगित झाल्यानंतर सध्या सगळे खेळाडू आपापल्या घरीच आहेत. अशावेळी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन खेळाडूंनी लस घ्यावी, अशा सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत.  7 मे रोजी शिखर धवनने दिल्लीत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तसंच 8 मे रोजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबईत लस टोचून घेतली. रहाणे भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तो 3 महिने भारतीय संघासोबत असणार आहे.

रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस

दुसरीकडे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्च महिन्यातच कोरोना लस घेतली होती. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अहमदाबाद येथे शास्त्री यांनी कोरोना लसी घेतली होती. 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस दिली जात होती, त्यावेळी शास्त्री यांनी कोरोना लस घेतली.

खेळाडूंच्या लसीकरणाविषयी बीसीसीआयचा प्लॅन काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याअगोदर भारतीय खेळाडूंच्या लसीकरणाविषयी काय प्लॅन आहे?, असा प्रश्न बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना गांगुलीने संपूर्ण प्लॅन सांगितला.

“भारतीय खेळाडूंजवळ आता वेळ आहे. व्यक्तिगत पातळीवर ते स्वत: लस घेऊ शकतात. सगळे खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे लस घेणं त्यांच्यासाठी अधिक सोपं झालंय”, असं सौरव गांगुली म्हणाला.

खेळाडूंना फक्त कोविशिल्ड लसच घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविशिल्ड लस घेणं केवळ त्याच क्रिकेटपटूंसाठी आवश्यक आहे जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड मालिकेत भाग घेऊ शकतात.

भारतीय खेळाडूंनी कोविशिल्डचा पहिला डोस भारतात घेतल्यास त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेता येईल. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाचं कोविशिल्ड हे प्रोडक्ट असल्याने इंग्लंडमध्ये असताना भारतीय खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकतात.

(Indian Captain Virat kohli take Corona Vaccine Appeal People For Vaccination)

हे ही वाचा :

भारतीय क्रिकेटपटूंना केवळ ‘कोविशिल्ड’ लस घ्यायचा सल्ला, पण कारण काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.