नवतपस्विनी : कोल्हापूरची ‘तेजस्वी’ नेमबाज तेजस्विनी सावंत

नवतपस्विनी : कोल्हापूरची 'तेजस्वी' नेमबाज तेजस्विनी सावंत

नवरात्रीच्या निमित्ताने 'टीव्ही9 मराठी'च्या वेबसाईटवर दररोज भेटुया क्रीडा क्षेत्रातील मराठमोळ्या कर्तबगार तपस्विनींना. आज जाणून घेऊया आपला वेगळा ठसा उमटवणारी नेमबाज तेजस्विनी सावंत हिच्याबद्दल

अनिश बेंद्रे

|

Sep 30, 2019 | 2:18 PM

मुंबई : नेमबाजीसारख्या महागड्या खेळाचं साहित्य विकत घेण्यासाठी कर्जाऊ रक्कम घेणाऱ्या कोल्हापूरच्या मुलीने राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट केली आणि जगाला भारतीय नेमबाजीची दखल घ्यायला लावली. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तेजस्विनी सावंतने (Shooter Tejaswini Sawant TV9 Navtapaswini) जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान पटकावला.

गणवेशाच्या आकर्षणापोटी बालपणी तेजस्विनीला पोलिस किंवा सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. त्यातच तिचे वडील रवींद्र सावंत भारतीय नौदलात अधिकारी. त्यामुळे एनसीसीमध्ये तिने प्रवेश घेतला. नेमबाजीशी ओळख झाली आणि हळूहळू सराव सुरु झाला. कॉलेजमध्ये नेमबाजीच्या स्पर्धांतून बक्षिसंही मिळू लागल्याने तिला धीर आला.

कोल्हापुरात नेमबाजीच्या सरावासाठी फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. नेमबाजीसाठी आवश्यक साहित्य विकत घेण्यासाठी तिला पैसे उसने घ्यावे लागले होते. एक वेळ अशी आली होती, की तिने हार मानून नेमबाजी सोडण्याचा निश्चय केला होता. एखादी खाजगी नोकरी करुन कुटुंबीयांवरील ओझं कमी करण्याची तिची इच्छा होती.

पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये 2004 साली दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळी अवघ्या 24 वर्षांच्या असेलल्या तेजस्विनीने (Shooter Tejaswini Sawant TV9 Navtapaswini)भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिला वैयक्तिक पदक मिळालं नाही, पण भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवता आलं. अचूक लक्षवेध करत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तेजस्विनीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

या स्पर्धेनंतर मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपली स्वत:ची ओळख निर्माण करायचीच, असं तिने ठरवलं. भारतीय संघांच्या शिबिरांमधून रितसर प्रशिक्षण सुरु झाल्यामुळे तिला खेळ सुधारायला बरीच मदत झाली. 10 मी. एअर रायफल स्पर्धांच्या जागतिक क्रमवारीत तिला चौदावं स्थान मिळालं होतं.

2006 साली मेलबर्नला भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेती अंजली भागवत आणि जागतिक विक्रमाची नोंद असलेली सुमा शिरुर यांना मागे टाकत तेजस्विनीची निवड झाली. ही निवड सार्थ ठरवत तेजस्विनीने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली.

2006 मध्ये मेलबर्नला झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल एकेरी आणि महिलांच्या 10 मीटर एअर रायफल दुहेरी प्रकारात अवनीत कौर सिद्धूसोबत तिने सुवर्णपदकाची कमाई केली.

जर्मनीत म्युनिकमध्ये 2009 साली झालेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत 50 मीटर रायफल-थ्री पोझिशन्स प्रकारात तेजस्विनीने कांस्यपदक पटकावलं. त्यानंतर म्युनिकमध्येच 50 मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तिने जागतिक विजेतेपद प्राप्त केलं. 50 मीटर रायफलप्रोन प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.

2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतही तेजस्विनीने (Shooter Tejaswini Sawant TV9 Navtapaswini) महिलांच्या 50 मीटर रायफलप्रोन प्रकारात रजत, तर महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्ण पटकावलं.

जागतिक स्पर्धेतलं यश हे एका रात्रीत मिळालेलं नाही. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. एकाग्रता आहे, त्याग आहे. नेमबाजी हा अतिशय महागडा खेळ आहे. तेजस्विनीने कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा एअर रायफल गटातल्या एखाद्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कमीत कमी पाच-सात हजार रुपये लागत असत.

2010 मध्ये तेजस्विनीच्या डोक्यावरुन पितृछत्र हरपलं. 2011 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपलं यश, मानसन्मान पाहण्यासाठी वडील नसल्याची खंत तिला नेहमी जाणवते. आपल्याप्रमाणेच देशातील मुलींनी या वेगळ्या वाटेवरील खेळाकडे पाहावं, यासाठी ती प्रयत्नशील आहे.

संबंधित बातम्या

नवतपस्विनी : यशाचा षटकार ठोकणारी क्रिकेटपटू पूनम राऊत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें