मी थेट सांगते की लग्न… स्मृती मानधनाचं लग्न का तुटलं? सर्वात मोठं कारण पुढे…
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. स्मृती मानधना हिने अखेर पलाश मुच्छल याच्यासोबतचे लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नात्याबद्दल विविध दावे केली जात होती.

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत पलाश आणि स्मृती मानधना यांचे लग्न होते. संगीत, हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे येताना दिसली. स्मृती मानधना आणि पलाश काही व्हिडीओंमध्ये धमाकेदार डान्स करताना संगीतमध्ये दिसले. लग्न घटिका काही तासांवर आलेली असताना अचानक स्मृती मानधना हिच्या वडिलांना त्रास झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांची तब्येत लक्षात घेता हे लग्न पुढे ढकलत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, यादरम्यान पलाश मुच्छल हा स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा करत काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाली.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची नवीन तारीख कधी पुढे येणार यावरून विविध चर्चा रंगताना दिसल्या. 7 डिसेंबर 2025 रोजी पलाश आणि स्मृती मानधना यांचे लग्न होईल, असे सांगितले जात होते. मात्र, यावर स्मृती मानधना हिच्या भावाने खुलासा करत त्याला नकार दिला. शेवटी आज 7 डिसेंबर रोजीच स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठी खळबळ उडवून दिली.
स्मृती मानधना हिने मोठी पोस्ट शेअर करत पलाश मुच्छल याच्यासोबतचे लग्न रद्द करत असल्याचे जाहीर केले. लग्न रद्द करत असल्याचे स्मृती मानधना हिने जाहीर केले असले तरीही तिने लग्न रद्द करण्याचे कारण मात्र लपवून ठेवले. स्मृती मानधना हिने आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. पलाश यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. अखेर स्मृती मानधना हिने लग्न रद्द केल्याचे स्पष्टपणे आपल्या पोस्टमध्ये सांगितले.
स्मृती मानधना हिने मी इथेच थांबवू इच्छिते आणि तुम्ही सर्वांनीही तेच करावे, मी तशी विनंती करते की, कृपया दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. पुढे जाण्याची संधी द्या म्हणते स्मृती मानधना हिने आपल्या पोस्टचा शेवट केला. स्मृती मानधना हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.
