AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : KKR ला मोठा झटका, स्टार गोलंदाज सरावादरम्यान दुखापतग्रस्त, मायदेशी परतणार

आयपीएलमध्ये आतापर्यंत अवघे 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यादरम्यान एकेक खेळाडू दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर होत आहेत.

IPL 2020 : KKR ला मोठा झटका, स्टार गोलंदाज सरावादरम्यान दुखापतग्रस्त, मायदेशी परतणार
| Updated on: Oct 07, 2020 | 11:26 AM
Share

दुबई : इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) 13 व्या सीजनमध्ये आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यादरम्यान एकेक खेळाडू दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर होत आहेत. सनरायजर्स हैदराबादचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यातच आता कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडूची भर पडली आहे. (IPL 2020 – KKR bowler Ali Khan out from 13th season due to injury)

केकेआरचा दुखापतग्रस्त जलदगती गोलंदाज अली खान आयपीएलबाहेर पडला आहे. अली खान हा आयपीएलमध्ये सहभागी होणारा अमेरिकेचा पहिला खेळाडू आहे. परंतु त्याला अद्याप डेब्यू करण्याची संधी मिळाली नव्हती. विशेष म्हणजे अली खान केकेआरच्या एका दुखापतग्रस्त खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून संघात सहभागी झाला होता. परंतु डेब्यू करण्यापूर्वी त्याला आयपीएलबाहेर व्हावे लागले आहे.

केकेआरचा खेळाडू हॅरी दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर केकेआरने हॅरीच्या जागी अली खान याला संघात घेतले होते. परंतु आता दुखापतग्रस्त होऊन अली खान स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. याबाबत केकेआरकडून सांगण्यात आले आहे की, “अली खान हा आयपीएलमध्ये निवड झालेल्या पहिला अमेरिकन खेळाडू होता. परंतु सरावादरम्यान तो जखमी झाला आहे. त्यामुळे तो ही स्पर्धा खेळू शकणार नाही”.

सीपीएलपासून चर्चा

अली खानने कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये शानदार प्रदर्शन करुन सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधलं होतं. अली खान हा सीपीएलचं यंदाचं विजेतेपद पटकावणाऱ्या ट्रिवागो नाईट रायडर्स संघाकडून खेळत होता. त्याने 8 सामन्यांमध्ये 7.43 च्या इकोनॉमी रेटने 8 बळी घेतले आहेत.

दरम्यान, आयपीएल 13 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र झाली आहे. दोन विजय आणि दोन पराभवांसह केकेआर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आज केकेआरचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे.

संबंधित बातम्या

Kagiso Rabada | आई वकील, वडील डॉक्टर, रग्बी टीममध्ये स्थान न मिळाल्याने क्रिकेटला पसंती, रबाडाचा रंजक प्रवास

IPL 2020 | वयाच्या 19 वर्षी क्रिकेटमध्ये पर्दापण, भुवनेश्वरच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

(IPL 2020 – KKR bowler Ali Khan out from 13th season due to injury)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.