IPL 2025 Final: मोदी स्टेडियमवरचा सर्वाधिक आणि सर्वात कमी स्कोअर किती? टॉस जिंकणं किती महत्त्वाचं? गेम पालटणार?
RCB vs PBKS Final : आयपीएल फायनलमध्ये आज आरसीबी आणि पंजाब हे दोन संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेतेपदासाठी लढतील. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. याच्या अगदी अर्धा तास आधी, दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात येतील. टॉस कोण जिंकणार, त्याचा सामन्यावर कसा परिणा होईल ? जाणून घेऊया.

Narendra Modi Stadium Pitch Report : आयपीएल 2025 स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यात, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी आणि पंजाब यांच्यात जेतेपदासाठी स्पर्धा होईल. दोन्ही संघ पहिल्यांच आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी कसून प्रयत्न करणार असून त्यांचे चाहतेही आपापल्या आवडत्या संघाला फूल सपोर्ट करताना दिसतील. आजचा अंतिम सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. मात्र त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार असून दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील. आजच्या सामन्यात नाणेफेकीपासून ते खेळपट्टीपर्यंत (टॉस ते पिच) हे अगदी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आज पिच कसं असेल जाणून घेऊया.
कसं असेल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पिच ?
अहमदाबादच्या ज्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे, तेथील मधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. रविवारी झालेल्या क्वॉलिफायर 2 मध्येही या मैदानावर खूप धावा झाल्या. मुंबई इंडियन्सने 203 धावा केल्या. आणि पंजाबने ते आव्हान सहज पार करत मुंबईला हरवलं आणि अंतिम फेरीत सहज प्रवेश केला. 2025 मध्ये या मैदानावर एकूण आठ सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 6 सामने जिंकले आहेत.
मात्र, मनोरंजक गोष्ट अशी आहे की याच मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 204 धावांचे लक्ष्य सहज गाठल होतं.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल मॅचचा रेकॉर्ड काय ?
आतापर्यंत या स्टेडियमवर आयपीएलचे एकूण 43 सामने खेळवले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 21 सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 22 सामने जिंकले आहेत.
या मैदानावरील सर्वाधिक स्कोअर – 243 धावा
या मैदानावरील सर्वात कमी स्कोअर – 89 धावा
दोन्ही संघांते संभावित प्लेईंग 11
पंजाब किंग्स संभावित XII :
1) प्रियांश आर्य, 2) प्रभसिमरन सिंग, 3) जॉश इंग्लिस (विकेटकीपर), 4) श्रेयस अय्यर (कप्तान), 5) नेहाल वढेरा, 6) शशांक सिंह, 7) मार्कस स्टॉयनिस, 8) अज़मतुल्लाह ओमरज़ाई, 9) विजयकुमार वैशक, 10) काइल जेमिसन, 11) अर्शदीप सिंह, 12) युज़वेंद्र चहल/हरप्रीत बराड़
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू XII :
1) फ़िल सॉल्ट, 2) विराट कोहली, 3) मयंक अग्रवाल, 4) रजत पाटीदार (कप्तान), 5) लियम लिविंगस्टन/टिम डेविड, 6) जितेश शर्मा (विकेटकीपर), 7) रोमारियो शेफ़र्ड, 8) क्रुणाल पंड्या, 9) भुवनेश्वर कुमार, 10) यश दयाल, 11) जॉश हेज़लवुड, 12) सुयश शर्मा
