AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला दुसऱ्या सामन्यातही संधी नाहीच, दोघांचं पदार्पण

Ireland vs India 2nd T20I Toss and Playing 11 : टीम इंडियाच्या बाजूने आयर्लंड विरूद्ध सलग दुसऱ्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल लागला आहे. भारताने आयर्लंड विरुद्ध चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे.

IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला दुसऱ्या सामन्यातही संधी नाहीच, दोघांचं पदार्पण
IRE vs IND 2nd T20i Toss and Playing 11Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 28, 2026 | 6:12 PM
Share

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लब इथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाज पहिल्या सामन्यात आयर्लंडला कमी धावसंख्येत रोखण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे आता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाज आपली चूक सुधारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियासाठी करो या मरो सामना

यजमान आयर्लंड 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला मालिका बरोबरीत राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. टीम इंडियाकडून सलग दुसऱ्या सामन्यातही युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला संधी दिली नाही. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे वैभवला आता आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

भारताकडून दोघांचं पदार्पण

दरम्यान टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. या दोघांनीही पहिल्या सामन्यात निराशा केली होती. त्यामुळे दोघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर अंतिम सामन्यातून टीम इंडियाकडून दोघांचं पदार्पण झालं आहे. प्रिन्स यादव आणि मुंबईकर सूर्यांश शेडगे या दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता डेब्युटंट खेळाडू आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कॅप नंबर 120 आणि 121

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : टीम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलर्ड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा