धोनी निवृत्तीच्या तयारीत? ट्विटरवर #DhoniRetires ट्रेंड

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीबाबत कुठलीही अधिकृत माहिती नसतानाही सोशल मीडियावर मात्र #DhoniRetires हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे (Dhoni's Retirement). त्यामुळे ऐन दिवाळीत धोनीचे चाहते संभ्रमात आहेत.

धोनी निवृत्तीच्या तयारीत? ट्विटरवर #DhoniRetires ट्रेंड

मुंबई :भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीबाबत कुठलीही अधिकृत माहिती नसतानाही सोशल मीडियावर मात्र #DhoniRetires हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे (Dhoni’s Retirement). त्यामुळे ऐन दिवाळीत धोनीचे चाहते संभ्रमात आहेत, धोनी खरंच मैदान सोडून जाणार का, अशी चिंता आता त्यांना सतावते आहे (Dhoni’s Retirement).

ट्विटरवर धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील यशाबाबत चर्चा होत आहे. त्याशिवाय #DhoniRetires या हॅशटॅगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तर काहीजण धोनीने यापुढेही देशासाठी खेळायला हवं, असं मत व्यक्त करत आहेत. धोनी लवकरच निवृत्ती घेणार, अशी शक्यता ट्विटरवर वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे चाहते दु:खी झाले आहेत. तर काहींनी त्याच्या समर्थनात #NeverRetireDhoni आणि #ThankYouDhoni हा हॅशटॅग वापरण्यास सुरुवात केली आहे.

धोनीच्या निवृत्तीबाबत अफवा बऱ्याच काळापासून येत आहेत. विश्वचषक-2019 नंतर धोनीने ब्रेक घेतला. या विश्वचषकामध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात धोनी शेवटचा खेळला, त्यानंतर तो अद्यापही मैदानात उतरलेला नाही.

रांचीमध्ये कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. त्यानंतर धोनीने घरच्या मैदानावर विराट कोहली आणि संघाची भेट घेतली. यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने रविवारी धोनीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला. यामध्ये धोनी टेबल टेनिस खेळताना दिसत आहे.

मात्र, धोनी खरंच निवृत्त होणार का, असा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना सतावतो आहे. त्यामुळे आता यावर स्वत: धोनीचं स्पष्टीकरण येणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *