Mann Ki Baat : पॉडकास्टमधील मोदींच्या त्या चर्चेची दखल आणि फुटबॉलपटूंचं आयुष्य बदललं, पंतप्रधानांनी काय सांगितलं?
Pm Narendra Modi On Shahdol : भारतात आता क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांनाही प्रोत्साहन दिलं जात आहे. खेळाडूंना गेल्या काही वर्षांत अनेक स्पर्धांमुळे त्यांच्यातील प्रतिभा दाखवून देण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात मध्यप्रदेशातील एका गावातील फुटबॉलपटूंबाबत एक किस्सा सांगितला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसह ‘मन की बात’ या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. पंतप्रधान मोदी अनेक मुद्दयांवरुन नागरिकांना संबोधित करत असतात. मोदींनी रविवारी 31 ऑगस्ट रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 125व्या भागात प्रेरणादायी किस्सा सांगितला. त्यामुळे फक्त देशातच नाही तर साऱ्या जगात त्या किस्स्याची चर्चा पाहायला मिळाली. मोदींनी मन की बात कार्यक्रमात बोलताना ते काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅन याच्यासह सहभागी झाल्याचे म्हणाले.
मोदी काय म्हणाले?
मोदींनी मन की बात या कार्यक्रमात बोलताना पॉडकास्टमध्ये फुटबॉलबाबत एका गावातील तरुणांमध्ये असलेल्या आवडीचा उल्लेख केल्याचं सांगितलं. मोदींनी या पॉडकास्टमध्ये बोलताना मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील एका गावातील तरुणांमध्ये फुटबॉलच्या आवडीचा उल्लेख केला.
सध्या पॉडकास्टची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. पॉडकास्टद्वारे जगभरात विविध विषयांवर चर्चा केली जाते, असं मोदींनी म्हटलं. मोदींनी या दरम्यान शहडोलमधील फुटबॉल चाहत्यांचा उल्लेख केला. मोदींकडून फुटबॉल प्रेमींचा उल्लेख केल्यानंतर त्याची दखल जर्मनीकडून घेण्यात आली.
मोदींनी ‘मन की बात’मध्ये काय सांगितलं?
‘प्रिय देशवासियांनो, आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारतातील प्रतिभेवर आहे. मी याबाबत एक आनंददायी अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सध्या पॉडकास्टची क्रेझ आहे. अनेक लोकं विविध विषयांवर पॉडकास्टद्वारे चर्चा करतात आणि ऐकतातही. मी गेल्या काही दिवसांआधी पॉडकास्टमध्ये सहभागी झालो होतो. मी प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यासोबत चर्चा केली. माझी त्या पॉडकास्टमध्ये फ्रीडमन यांच्यासह अनेक विषयांवर चर्चा झाली. पॉडकास्टमध्ये झालेली चर्चा अनेकांनी ऐकली. मी या पॉडकास्टमध्ये एका विषयावर लक्ष केंद्रीत केलं”, असं मोदी म्हणाले.
मोदींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा पॉडकास्ट फक्त भारतातच नाही तर जगभरातील लोकांनी ऐकला. पॉडकास्ट ऐकणाऱ्यांमध्ये जर्मनीतील एका खेळाडूचाही समावेश होता. मोदींनी जर्मनीतील या खेळाडूबाबत काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
मोदी जर्मनीतील खेळाडूबाबत काय म्हणाले?
“मी पॉडकास्टमध्ये उल्लेख केलेल्या एका मुद्दयाने जर्मनीतील एका खेळाडूचं लक्ष वेधून घेतलं. त्या खेळाडूने त्या विषयावर सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्या खेळाडूने जर्मनीतील भारतीय दुतावासासह संपर्क साधला. तसेच त्या खेळाडूने या संदर्भात भारतासह सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली”, असं मोदींनी नमूद केलं.
“मी पॉडकास्टमध्ये बोलता बोलता मध्यप्रदेशातील शहडोलमधील एका गावातील लोकांमध्ये फुटबॉलप्रती असलेल्या आवडीचा उल्लेख केला. मी 2 वर्षांपूर्वी शहडोलला गेला होतो. तेव्हा तिथे फुटबॉलपटूंना भेटलो. तसेच मी पॉडकास्टमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना शहडोलच्या फुटबॉलपटूंचा उल्लेखही केला होता”, असंही मोदींनी स्पष्ट केलं.
मोदींच्या पॉडकास्टची कोच डिएतमार बेईयर्सडोर्फरकडून दखल
पॉडकास्टमधील चर्चा जर्मनीचा फुटबॉलर आणि कोच डिएतमार बेईयर्सडोर्फर यांनीही ऐकल्याचं मोदींनी म्हटलं. मोदींनी याबाबत काय सांगितलं? हे जाणून घेऊयात.
“मी पॉडकास्टमध्ये फुटबॉलप्रेमींचा केलेल्या उल्लेखाने डिएतमार बेईयर्सडोर्फर याचं लक्ष वेधलं. बेईयर्सडोर्फर हे शहडोलमधील खेळाडूंचा फुटबॉलवर असलेल्या प्रेमामुळे प्रभावित झाले. त्यामुळे जर्मनीच्या या प्रशिक्षकाने शहडोलमधील निवडक खेळाडूंना आपल्या अकॅडेमीत प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली”, असंही पंतप्रधान म्हणाले.
निवडक खेळाडूंचा जर्मनी दौरा
जर्मनीतील कोचने दिलेल्या ऑफरनतंर मध्यप्रदेश सरकारने त्यांच्यासह पत्रव्यवहार केला. त्यानंतर आता निवडक फुटबॉलपटू ट्रेनिंगसाठी जर्मनीला जाणार असल्याचं मोदींनी सांगितलं.
“त्यानंतर मध्यप्रदेश सरकारकडून त्यांच्यासह संपर्क साधण्यात आला. लवकरच शहडोलमधील निवडक खेळाडू सरावासाठी जर्मनीला रवाना होणार आहेत. भारतात फुटबॉलची सातत्याने वाढणाऱ्या क्रेझमुळे मला आनंद होतोय.”, अशा शब्दात मोदींनी आनंद व्यक्त केला. तसेच मोदींनी यावेळेस फुटबॉलपटूंना आवाहन केलं.
“तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा शहडोल जा. तिथल्या खेळाडूंमध्ये फुटबॉलप्रती असलेलं प्रेम आणि क्रांती पाहा”, असं आवाहनही मोदींनी फुटबॉलपटूंना केलं.
