Asian Games 2023 | एशियन गेम्स 2023 साठी भारतीय कबड्डी संघ जाहीर, कुणाला संधी कुणाला डच्चू?
Asian Games 2023 | एशियन गेम्सचा थरार हा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. या एशियन गेम्ससाठी महिला आणि पुरुष भारतीय कबड्डी संघ जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई | एशियन गेम्स 2023 साठी 12 सदस्यीय मेन्स कबड्डी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच वूमन्स कबड्डी टीम इंडियाही जाहीर करण्यात आली आहे. या 12 सदस्यीय टीममध्ये पुन्हा एकदा डुबकी किंग प्रदीप नरवाल याला संधी देण्यात आलेली नाही. टीममध्ये फक्त एक बदल करण्यात आला आहे. मोहित गोयत याच्या जागी युवा रेडर आकाश शिंदे याची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आकाश शिंदे याची पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. तसेच एशियन गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये रेडिंगची जबाबदारी ही पवन कुमार सेहरावत, नवीन कुमार, अर्जुन देशवाल, सचिन तंवर, अस्लम इनामदार आणिन आकाश शिंदे यांच्यावर असेल.
तसेच डिफेंसची जबाबदारी ही नितेश कुमार, प्रवेश, नितीन रावल, सुनील कुमार, विशाल भारद्वाज आणि सुरजीत सिंह यांच्यावर असणार आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे प्रदीप नरवाल याला संधी देण्यात आली नाही. प्रदीपला याआधी झालेल्या अनेक सामन्यांमध्ये आपली छाप सोडता आली नव्हती. इतकंच नाही, तर ट्रायल दरम्यानही प्रदीपला विशेष काही करता आलं नाही.
या 12 सदस्यीय कबड्डी टीम इंडियावर मोठी जबाबदारी असणार आहे. या 12 खेळाडूंकडून भारताला मोठी अपेक्षा आहे. टीम इंडियाला 2018 मध्ये सुवर्ण पदक जिंकण्यात अपयश आलं होतं. टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये पराभव झाल्याने ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र आताची टीम मजबूत आहे. नुकतंच याच खेळाडूंनी एशियन कबड्डी चॅम्पियनशीपमध्ये धमाका केला होता. त्यामुळे अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
दरम्यान मेन्स कबड्डी टीम इंडियाने 1990, 1994, 1994, 20023, 2006, 2010, आणि 2014 मध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं. मात्र 2018 मध्ये भारताला सुवर्ण कामगिरी करण्यात अपयश आलं होतं.
एशियन गेम्ससाठी मेन्स कबड्डी टीम इंडिया | पवन कुमार सेहरावत, सुनील कुमार, असलम इनामदार, अर्जुन देशवाल, नवीन कुमार, सुरजीत सिंह, प्रवेश मलिक, नितेश कुमार, नितिन रावल, विशाल भारद्वाज, सचिन तंवर आणि आकाश शिंदे.
एशियन गेम्ससाठी वूमन्स कबड्डी टीम इंडिया | अक्षिमा, ज्योती, पूजा, पूजा, प्रियांका, पुष्पा, साक्षी कुमारी, रितू नेगी, निधी शर्मा, सुषमा शर्मा, स्नेहल शिंदे आणि सोनाली शिंगटे.
