लाज, शरम आणि अपमान, हार्दिक पंड्या घराबाहेर येईना, फोन उचलेना

मुंबई : कॉफी विथ करणमधील वादानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातून वगळण्यात आलंय. आयपीएल आणि आगामी विश्वचषकात दोघांना खेळता येईल की नाही याबाबतही सस्पेन्स कायम आहे. पण हार्दिक पंड्या या प्रकरणाने खचून गेलाय. तो घराबाहेर पाऊलही टाकत नसून कुणाचे फोन घेणंही त्याने बंद केल्याचं त्याचे वडील […]

लाज, शरम आणि अपमान, हार्दिक पंड्या घराबाहेर येईना, फोन उचलेना
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : कॉफी विथ करणमधील वादानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातून वगळण्यात आलंय. आयपीएल आणि आगामी विश्वचषकात दोघांना खेळता येईल की नाही याबाबतही सस्पेन्स कायम आहे. पण हार्दिक पंड्या या प्रकरणाने खचून गेलाय. तो घराबाहेर पाऊलही टाकत नसून कुणाचे फोन घेणंही त्याने बंद केल्याचं त्याचे वडील हिमान्शू यांनी म्हटलंय.

ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर हार्दिकने भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरा वन डे सामना पाहिला. पण अजून त्याने घराबाहेर पाऊलही टाकलेलं नाही. कुणाचे फोनही तो घेत नाही. सध्या तो फक्त आराम करत आहे, असं हिमान्शू यांनी ‘मिड डे’शी बोलताना सांगितलं.

गुजरातमधील सुरतमध्ये जन्मलेला हार्दिक पंड्या दरवर्षी मकरसंक्रांत उत्साहात साजरा करतो. पूर्ण गुजरातमध्ये हा सण पंतग उडवून साजरा केला जातो. पण पंड्याने दरवर्षीप्रमाणे यंदा पतंगही उडवला नाही. हार्दिकला पंतग उडवणं आवडतं. पण त्याला क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे कधीही ती संधी मिळत नाही. यावेळी तो घरी होता. पण डिस्टर्ब असल्यामुळे त्याने सणही साजरा केला नाही, असं हिमान्शू म्हणाले. वाचाहार्दिक पंड्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच ही अभिनेत्री भडकली

कॉफी विथ करणमधील वक्तव्य आणि टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे हार्दिक डिस्टर्ब झालाय. पुन्हा अशी चूक कधीही करणार नसल्याचं त्याने मनाशी ठरवलंय. आम्ही कुणीही त्याच्याशी या विषयावर काहीही बोलायचं नाही ठरवलंय. मोठा भाऊ कृणालही या शोबद्दल हार्दिकशी काही बोललेला नाही. आम्ही फक्त बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहतोय, अशी माहिती हिमान्शू यांनी दिली.

कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महिलांविरोधी वक्तव्यामुळे दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे दोघांना बाहेर बसावं लागलंय. आगामी विश्वचषक खेळता येईल की नाही याबाबतही साशंकता आहे. वाचाBCCI झटका देण्याच्या तयारीत, पंड्या-राहुल वर्ल्डकपमधूनही आऊट?

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.