AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Olympics 2024 Highlights And Update: भारताला सहाव्या दिवशी तिसरं पदक, स्वप्निल कुसाळेची ऐतिहासिक कामगिरी, असं आहे 2 ऑगस्टचं वेळापत्रक

| Updated on: Aug 01, 2024 | 11:35 PM
Share

Paris Olympics 1 August Updates Highlights In Marathi : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील आजचा सहावा दिवस अविस्मरणीय ठरला. भारताला स्वप्निल कुसाळेने पदक मिळवून दिलं. जाणून घ्या दिवसभरातील भारताची कामगिरी.

Olympics 2024 Highlights And Update: भारताला सहाव्या दिवशी तिसरं पदक, स्वप्निल कुसाळेची ऐतिहासिक कामगिरी, असं आहे 2 ऑगस्टचं वेळापत्रक
paris olympics Swapnil Kusale bronze medal

भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील सहावा दिवस (1 ऑगस्ट) ऐतिहासिक ठरला. भारताला तिसरं पदक मिळालं. भारताचा नेमबाज कोल्हापूरकर स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक जिंकूून इतिहास घडवला. स्वप्निल महाराष्ट्राकडून  भारताला पदक मिळवून देणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याआधी 72 वर्षांआधी 1952 साली कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं. तसेच दिवसभर भारताच्या काही खेळाडूंनी विजय मिळवत आपलं आव्हान कायम ठेवलंय. तर काहींचं पराभवासह आव्हान संपुष्ठात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Aug 2024 11:28 PM (IST)

    भारताचं सातव्या दिवसाचं वेळापत्रक जाणून घ्या

    भारतासाठी सहावा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक मिळवून दिलं. त्यामुळे भारताच्या पदकाची संख्या 3 झाली. आता भारतीय खेळाडू सातव्या दिवशी खेळण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घ्या भारताचं 2 ऑगस्टच  वेळापत्रक.

    टीम इंडियाचं 2 ऑगस्टचं वेळापत्रक

  • 01 Aug 2024 11:22 PM (IST)

    भारतासाठी सहावा दिवस ऐतिहासिक

    भारताला सहाव्या दिवशी नेमबाज स्वप्निल कुसाळे याने भारताला तिसरं आणि कांस्य पदक मिळवून दिलं. भारताचं हे एकूण आणि नेमबाजीतील तिसरं पदक ठरलं. तसेच काही खेळाडूंनी विजय मिळवत पदकाचं स्वप्न कायम राखलंय. तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला.  महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीचा पराभव झाला आणि पदकाच्या हॅटट्रिकची संधी हुकली. बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. लक्ष्य सेनने एचएस प्रणॉयचा पराभव केला.  अंजुम मुद्गिल आणि सिफ्त कौर सामरा महिला शूटिंग 50 मीटर एअर रायफल 3 पोजिशंस प्रकारात पराभूत झाल्या.  प्रियंका गोस्वामी महिला 20 किमी वॉकिंग स्पर्धेतून बाहेर झाली. हॉकी टीम इंडियाला बेल्जिमयने पराभूत केलं.

  • 01 Aug 2024 11:05 PM (IST)

    पीव्ही सिंधूचा पराभव

    भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील प्री क्वार्टर फायनलमधील सामन्यात पराभव झाला आहे. चीनच्या गे बिंग जियाओने सिंधूचा पराभव केला. चीनच्या खेळाडूने हा सामना 21-19 आणि 21-14 अशा फरकाने जिंकला. सिंधूच्या पराभवासह तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे.

  • 01 Aug 2024 10:15 PM (IST)

    बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा सामना सुरु, चीनचं आव्हान

    पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. सिंधूसमोर चीनच्या गे बिंग जियाओचं आव्हान आहे.

  • 01 Aug 2024 07:00 PM (IST)

    लक्ष्य सेन याची क्वार्टर फायनलमध्ये धडक

    पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत लक्ष्य सेन याने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्यचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. लक्ष्यने दुसऱ्या सामन्यात प्रणॉयचा 21-6 फरकाने धुव्वा उडवला आहे.

    लक्ष्य सेनची एचएस प्रणॉयवर मात

  • 01 Aug 2024 05:52 PM (IST)

    सात्विक-चिरागकडूनही निराशा, क्वार्टर फायनलमध्ये पराभव

    सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा पुरुष दुहेरी प्रकारात क्वार्टर फायलनमध्ये पराभव झाला आहे. या जोडीचं पराभवासह पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे. या जोडीने पहिल्या सेटमध्ये विजय मिळवून चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर पडले आणि पराभूत झाले. सात्विक आणि चिरागला मलेशियाच्या जोडीकडून 21-13, 14-21 आणि 16-21 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

  • 01 Aug 2024 05:19 PM (IST)

    अंजुम आणि सिफ्तचं पॅकअप

    अंजुम मुद्गिल आणि सिफ्त कौर सामरा महिला शूटिंग 50 मीटर एअर रायफल 3 पोजिशंस प्रकारातून बाहेर झाल्या आहेत. अंजुम पात्रता फेरीत 584 पॉइंट्ससह 18व्या आणि सिफ्त 575 पॉइंट्ससह 31 व्या स्थानी राहिली. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी टॉप 8 मध्ये येणं बंधनकारक होतं. मात्र त्यात दोघीही अपयशी ठरल्या.

  • 01 Aug 2024 04:45 PM (IST)

    पुण्यातील डेक्कन परिसरातील अतिक्रमणावर कारवाई

    पुण्यातील डेक्कन परिसरातील झेड ब्रीज खाली असणाऱ्या अनधिकृत आस्थापनांनवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे . शहरभर महापालिकेकडून बांधकामावर कारवाई अजूनही सुरूच आहे. महापालिका अधिकारी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात झेड ब्रिज खालच अतिक्रमण पालिकेने हटवलं आहे.

  • 01 Aug 2024 04:25 PM (IST)

    सरबज्योत सिंगचा क्रीडामंत्र्यांच्या हस्ते गौरव

    ऑलिम्पिक पदक विजेता सरबज्योत सिंगचा देशात परतल्यावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  • 01 Aug 2024 04:14 PM (IST)

    प्रियंका गोस्वामीचा पराभव

    भारतासाठी वाईट बातमी समोर आली आहे. प्रियंका गोस्वामी महिला 20 किमी वॉकिंग स्पर्धेतून बाहेर झाली आहे. प्रियंकाची निराशाजनक कामगिरी राहिली. प्रियंकाला या प्रकारात 45 पैकी 41व्या स्थानी समाधान मानावं लागलं.

  • 01 Aug 2024 03:31 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांकडून स्वप्निल कुसाळेचं अभिनंदन

    महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरं आणि पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्निलच्या या कामगिरीसाठी त्याचं अभिनंदन केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वप्निलला मोठं आश्वासन दिलं आहे. “स्वप्निलला जी काही मदत पाहिजे असेल ती राज्य सरकारकडून दिली जाईल”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

    मुख्यमंत्री काय म्हणाले?

  • 01 Aug 2024 03:13 PM (IST)

    हॉकी टीम इंडियाचा पहिला पराभव, बेल्जियमचा 2-1 ने विजय

    बेल्जियमने हॉकी टीम इंडियाचा  2-1 अशा फरकाने धुव्वा उडवला आहे. बेल्जियमने या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताचा हा पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिला पराभव ठरला आहे.

  • 01 Aug 2024 02:30 PM (IST)

    हॉकी टीम इंडियासमोर-बेल्जियमचं आव्हान

    हॉकी टीम इंडिया विरुद्ध बेल्जियम यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. बेल्जियमने आपल्या गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारतासमोर बेल्जियमचं तगडं आव्हान असणार आहे.

  • 01 Aug 2024 01:55 PM (IST)

    स्वप्निल कुसाळेला कांस्य पदक

    कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने भारताला रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक मिळवून दिलं आहे. यासह भारताचं हे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं पदक ठरलं आहे.

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा डंका

  • 01 Aug 2024 01:37 PM (IST)

    स्वप्निल कुसाळेकडून पदकाची आशा, सामना सुरु

    कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळे याचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल थ्री पोजिशनमधील पदकाचा सामना सुरु आहे. भारताला तिसरं पदक मिळण्याची शक्यता आहे. स्वप्निल भारताला पदक मिळवून देणार का? याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे.

Published On - Aug 01,2024 1:34 PM

Follow us
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.