SRH vs RCB, IPL 2021 Match 6 Result | शाहबाज अहमदची शानदार गोलंदाजी, मॅक्सवेलचे अर्धशतक, बंगळुरुचा सलग दुसरा विजय, हैदराबादवर 6 धावांनी मात

| Updated on: Apr 15, 2021 | 12:27 AM

SRH vs RCB Live Score Marathi | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने

SRH vs RCB, IPL 2021 Match 6 Result | शाहबाज अहमदची शानदार गोलंदाजी, मॅक्सवेलचे अर्धशतक, बंगळुरुचा सलग दुसरा विजय, हैदराबादवर 6 धावांनी मात
SRH vs RCB Live Score Marathi | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने

चेन्नई :  शाहबाज अहमदने एका ओव्हरमध्ये घेतलेल्या 3 विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. बंगळुरुकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडूने कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. (srh vs rcb live score ipl 2021 match sunrisers hyderabad vs royal challengers bangalore scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi)

SRH vs RCB Live Score साठी क्लिक करा

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Apr 2021 11:22 PM (IST)

    बंगळुरुचा सलग दुसरा विजय

    विराटसेनेने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे विजयी आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुच्या गोलंगदाजांसमोर हैदराबादला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. बंगळुरुचा हा सलग दुसरा विजय ठरला.

  • 14 Apr 2021 11:05 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता

    हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

  • 14 Apr 2021 11:00 PM (IST)

    राशिद खानचा पहिल्या चेंडूवर सिक्स

    हैदराबादला विजयसाठी 2 ओव्हरमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना राशिद खानने 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स खेचला.

  • 14 Apr 2021 10:58 PM (IST)

    हैदराबादला सहावा धक्का

    हैदराबादला सहावा धक्का बसला आहे. हर्षल पटेलने कर्णधार विराट कोहलीच्या हाती  विजय शंकरला आऊट केलं आहे.

  • 14 Apr 2021 10:49 PM (IST)

    हैदराबादला बॅक टु बॅक 2 धक्के

    हैदराबादने सलग 2 चेंडूत 2 विकेट्स गमावल्या आहेत. शहबाज अहमदने जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडे या सेट फलंदाजांना आऊट केलं. त्यामुळे सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला आहे.

  • 14 Apr 2021 10:45 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 24 चेंडूत 35 धावांची आवश्यकता

    हैदराबादला विजयासाठी 4 ओव्हर्समध्ये  35 धावांची आवश्यकता आहे. मनिष पांड आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी खेळत आहे.

  • 14 Apr 2021 10:40 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 30 चेंडूत 42 धावांची आवश्यकता

    हैदराबादला विजयासाठी 30 चेंडूत 42 धावांची आवश्यकता आहे. मैदानात मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टो ही आक्रमक जोडी खेळत आहे.  सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. 
     
  • 14 Apr 2021 10:34 PM (IST)

    हैदराबादला मोठा धक्का, कर्णधार आऊट

    हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आऊट झाला आहे. वॉर्नरने 37 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावांची खेळी केली.

  • 14 Apr 2021 10:33 PM (IST)

    कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक

    हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 31 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावलं आहे. वॉर्नर आणि मनिष पांडेच्या अर्धशतकापेक्षा अधिक धावांच्या भागीदारीमुळे हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचला आहे.

  • 14 Apr 2021 10:17 PM (IST)

    वॉर्नर-पांडेची जोडी जमली

    डेव्हिड वॉर्नर-मनिष पांडेची जोडी जमली आहे.  या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकापेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे   हैदराबाद मजबूत स्थितीत आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

  • 14 Apr 2021 09:57 PM (IST)

    हैदराबादच्या पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 50 धावा

    हैदराबादने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. हैदराबादने रिद्धीमान साहाची एकमेव विकेट गमावली. दरम्यान आता कर्णधार डेव्हिड वॉर्नर आण मनिष पांडे मैदानात खेळत आहेत.

  • 14 Apr 2021 09:42 PM (IST)

    मनिष पांडेचा क्लास सिक्स

    मनिष पांडेने सामन्यातील चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर क्लास सिक्स खेचला.

  • 14 Apr 2021 09:39 PM (IST)

    हैदराबादला पहिला धक्का

    हैदराबादने पहिली विकेट गमावली आहे. रिद्धीमान साहा आऊट झाला आहे. रिद्धीमानला मोहम्मद सिराजने ग्लेन मॅक्सवेलच्या हाती कॅच आऊट केलं आहे. रिद्धीमानने 1 धाव केली.

  • 14 Apr 2021 09:29 PM (IST)

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार डेव्हिड  वॉर्नर आणि रिद्धीमान साहा ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. हैदराबादला  विजयासाठी 150 धावांची आवश्यकता आहे.

  • 14 Apr 2021 09:11 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान

    ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. बंगळुरुकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावांची खेळी केली.

  • 14 Apr 2021 09:03 PM (IST)

    बंगळुरुला सातवा धक्का

    बंगळुरुने सातवी विकेट गमावली आहे. कायले जेमिन्सन आऊट झाला आहे.

  • 14 Apr 2021 08:44 PM (IST)

    बंगळुरुला पाचवा धक्का

    बंगळुरुला पाचवा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर आऊट झाला आहे.

  • 14 Apr 2021 08:35 PM (IST)

    बंगळुरुला मोठा धक्का, एबी डीव्हीलियर्स आऊट

    बंगळुरुला मोठा धक्का लागला आहे.  एबी डीव्हीलियर्स आऊट झाला आहे. त्यामुळे बंगळुरुची 95-4 अशी स्थिती झाली आहे. एबीने 1 धाव केली.

  • 14 Apr 2021 08:28 PM (IST)

    बंगळुरुला मोठा धक्का

    बंगळुरुला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट आऊट झाला आहे. सामन्यातील 13 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर विराटने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय शंकरने अचूक कॅच घेतला.  विराटने 33 धावा केल्या.

  • 14 Apr 2021 08:22 PM (IST)

    11 व्या ओव्हरमधून 22 धावा

    शाहबाद नदीमने सामन्यातील 11 व्या ओव्हरमध्ये 22 धावा लुटल्या. या ओव्हरमध्ये बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहलीने 22 धावा फटकावल्या. या ओव्हरमध्ये एकूण 2 सिक्स 2 चौकार आणि 2 सिंगल धावा घेतल्या.

  • 14 Apr 2021 08:01 PM (IST)

    बंगळुरुला दुसरा धक्का

    बंगळुरुने दुसरी विकेट गमावली आहे.  शाहबाज नदीमच्या रुपात दुसरा धक्का बसला आहे. नदीम 7 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात 14 धावांवर बाद झाला.

  • 14 Apr 2021 07:58 PM (IST)

    बंगळुरुच्या पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 47 धावा

    बंगळुरुने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 47 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि शाहबाज नदीम मैदानात खेळत आहेत.

  • 14 Apr 2021 07:44 PM (IST)

    बंगळुरुला पहिला धक्का

    बंगळुरुला पहिला धक्का बसला आहे.देवदत्त पडीक्कल आऊट झाला आहे. देवदत्तने 11 धावा केल्या.

  • 14 Apr 2021 07:34 PM (IST)

    विराटची चौकाराने सुरुवात

    विराटने बंगळुरुची आणि स्वत:च्या खेळीची सुरुवात चौकाराने केली आहे. विराटने भुवनेश्वर कुमारच्या बोलिंगवर सामन्यातील पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचला.

  • 14 Apr 2021 07:33 PM (IST)

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. विराट कोहली -देवदत्त पडीक्कल सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 14 Apr 2021 07:18 PM (IST)

    विराटसेनेचे अंतिम 11 खेळाडू

    विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सेवेल, एबी डीव्हीलियर्स, शाहबाज अहमद,डॅनियल ख्रिस्टियन, वॉशिंगटन सुंदर, कायले जेमिन्सन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

  • 14 Apr 2021 07:16 PM (IST)

    सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

    डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), रिद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, राशिद खान, विजय शंकर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि शहबाज नदीम.

  • 14 Apr 2021 07:12 PM (IST)

    बंगळुरुकडून 1 तर हैदराबादकडून 2 बदल

    आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. सनरायजर्स हैदराबादने संघात  2  तर बंगळुरुने 1 बदल केला आहे.

  • 14 Apr 2021 07:10 PM (IST)

    RCB साठी चहलचा 100वा सामना

    फिरकीपटू युजवेंद्र चहलचा हैदराबाद विरुद्धचा हा सामना बंगळुरुकडून खेळतानाचा 100 वा आयपीएल सामना आहे. त्यामुळे या सामन्यात  चहलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

  • 14 Apr 2021 07:03 PM (IST)

    हैदराबादने टॉस जिंकला

    हैदराबादने टॉस जिंकला आहे. डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून बंगळुरुला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे.

  • 14 Apr 2021 06:46 PM (IST)

    विराट विरुद्ध वॉर्नर

    आरसीबीसाठी सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने फटकावल्या आहेत, तर हैदराबादसाठी सर्वाधिक धावा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकावल्या आहेत. वॉर्नरने बंगळुरुविरुद्ध 593 धावा फटकावल्या आहेत. तर विराटने हैदराबाद विरुद्ध 531 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात या दोन्ही कर्णधारांमध्ये चांगलाचा सामना पाहायला मिळणार आहे.

  • 14 Apr 2021 06:38 PM (IST)

    हैदराबाद विरुद्ध बंगळुरु आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 6 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला आता काही मिनिटे बाकी आहेत.

Published On - Apr 14,2021 11:22 PM

Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.