AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादवला दणका, थेट श्रेयस अय्यर संघ निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, नुकताच..

सुर्यकुमार यादव याला मोठा धक्का बसताना दिसत आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय दौरा तोंडावर असतानाच निवड समितीच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामध्येच सूर्यकुमारची पत्नी देविशा हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर अजून चर्चांना उधाण आले.

सूर्यकुमार यादवला दणका, थेट श्रेयस अय्यर संघ निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, नुकताच..
Suryakumar Yadav and Shreyas Iyer
| Updated on: Jun 05, 2026 | 11:56 AM
Share

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होत आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादव याला मोठा दणका बसताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे. BCCI शनिवारी 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या घोषणेसह टीम इंडियाच्या नवीन कर्णधाराची घोषणा होईल. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समिती टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संधी देण्याची शक्यता फार जास्त कमी आहे. तशा घडामोडी देखील घडत आहेत. श्रेयस अय्यर याला ही संधी दिली जाऊ शकत असल्याचे दिसतंय. शिवाय श्रेयस अय्यर संघ निवडीच्या बैठकीला हजर राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हा सूर्याकरिता धक्का आहे. यादरम्यानच सूर्यकुमारची पत्नी देविका हिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली. ही पोस्ट शेअर करत तिने बीसीसीआयला उत्तर दिल्याचे बोलले जातंय. तिने काही फोटो शेअर केले, त्या फोटोमध्ये पहिल्या फोटोमध्ये सूर्यकुमार यादवसोबत ती दिसत असून दोघांसोबतच टी-20 विश्वचषक 2026 ट्रॉफी दिसत आहे.

श्रेयस अय्यर याने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2023  मध्ये बंगळूरु येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. भारतीय संघाचा पुढील टी-20 आंतरराष्ट्रीय दौरा आयर्लंडचा असेल. तिथे ते दोन टी-20 सामने खेळतील. त्यानंतर 5 टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. आयर्लंडविरुद्धचा पहिलाटी टी-20 सामना 26 जून रोजी असेल.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या एका अहवालानुसार, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीने तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे. भारताने यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2026 जिंकला. यादरम्यान जोरदार कामगिरी संघातील सर्व खेळाडूंनी केली.

भारताचा माजी यष्टीरक्षक सबा करीमने पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, सध्याचा सुर्याचा फॉर्म बघता सूर्यकुमार यादव हा भविष्यात निवड समितीच्या प्लॅनिंगमध्ये नसेल. यापूर्वीचा इतिहास बघितला तर लक्षात येईल की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याऐवजी नवीन संघ निवडण्यात आला. यावेळीही तेच होण्याची शक्यता आहे.

Follow Us
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द