AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : आता तो सूर्या राहिला नाही, त्याला OUT करण्याची वेळ आली, त्याची जागा घेण्यासाठी हे दोन प्लेयर सज्ज

Suryakumar Yadav : एकवेळ सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमधील भारतीय क्रिकेट संघाचा हुकूमी एक्का होता. सूर्या मैदानात उतरला की, चौकार, षटकारांचा पाऊस पडायचा. पण आता सूर्याचा तो करिष्मा राहिलेला नाही. त्याची जादू ओसरली आहे. वयाच्या पसतीशीत असलेल्या सूर्याच्या जागी भारताकडे दोन चांगले ऑप्शन्स आहेत.

Suryakumar Yadav : आता तो सूर्या राहिला नाही, त्याला OUT करण्याची वेळ आली, त्याची जागा घेण्यासाठी हे दोन प्लेयर सज्ज
Suryakumar Yadav
| Updated on: Apr 17, 2026 | 10:25 AM
Share

टीम इंडियाने भले दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला असेल. पण सूर्यकुमार यादव हा चिंतेचा विषय बनला आहे. एकवेळचा हा टीमचा हुकूमी एक्का आता संघावर ओझ बनत चालला आहे. आयसीसी टी20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव दीर्घकाळ नंबर 1 पोजिशनवर होता. सूर्या मैदानात उतरला की हमखास धावा बनणार हा विश्वास असायचा. पण आता चित्र बदललं आहे. तशी स्थिती राहिलेली नाही. सूर्यकुमार यादव काल पंजाब किंग्स विरुद्ध पहिल्या चेंडूवर शुन्यावर आऊट झाला. मागच्या वर्षभरापासून सूर्यकुमार यादवचा धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अपवाद फक्त टी20 वर्ल्ड कप आधी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेचा.

टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवने फक्त एक अर्धशतक झळकवलं. टीम इंडियाचा सलामीच्या सामन्यात USA विरुद्ध संघर्ष सुरु असताना सूर्या विकेटवर उभा राहिला व संघासाठी महत्वाची अर्धशतकी खेळी केली. अन्य सामन्यात त्याने काही धावा केल्यात. पण त्यांची क्षमता, दर्जा लक्षात घेता तो अन्य सामन्यात फिकाच ठरला असं म्हणावं लागेल. 2024 मधील टी20 वर्ल्ड कप विजयानंतर सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कॅप्टन बनला. तेव्हापासून त्याचा धावांसाठी संघर्ष सुरु झाला. फक्त न्यूझीलंड विरुद्ध मालिकेत त्याने तीन अर्धशतकं झळकवली. यात 196.74 च्या स्ट्राइक रेटने 242 धावा केल्या.

या सीजनमधील सूर्याचे आकडे काय आहेत?

भारताने जर टी20 वर्ल्ड कप जिंकला नसता तर सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील टी20 करिअरचा शेवटच होता. सूर्या टीम इंडियाकडून फक्त टी20 फॉर्मेटमध्ये खेळतो. सुदैवाने टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. त्याने पुढच्या 2028 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये आता तो पूर्वीचा सूर्या राहिलेला नाही याची आकडेच साक्ष देतायत. 16,51,6,33 आणि 0 ही त्याची पाच सामन्यातील कामगिरी आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 36 चेंडूत 51 धावा हीच त्याची त्यातल्या त्यात थोडी चांगली कामगिरी आहे. तीन वर्षांपूर्वी सूर्यकुमार यादवकडून 36 चेंडूत 51 धावा अशी अपेक्षा केली असती का? त्यावेळी तो त्याच्या करिअरच्या टॉपवर होता. पण आता सूर्याची जादू ओसरली आहे.

कुठले दोन प्लेयर सूर्याची जागा घेऊ शकतात?

आयपीएलच्या मागच्या काही सीजनमध्ये श्रेयस अय्यर, रजत पाटीदार यांनी दमदार प्रदर्शन केलय. आत्ताही त्यांची कामगिरी तशीच आहे. दोघांनी आपल्यातले उत्तम नेतृत्व गुण दाखवून दिले आहेत. सूर्याची जागा घेण्यासाठी हे दोन्ही प्लेयर सज्ज आहेत. श्रेयस अय्यर इतका चांगला खेळूनही त्याला भारताच्या टी20 संघात स्थान मिळत नाही. सूर्यकुमार आता 35 वर्षांचा आहे. त्याची जागा घेण्यासाठी अय्यर आणि पाटीदार हे दोन चांगले ऑप्शन्स आहेत.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.